ICC World Cup 2023 : 2023 च्या विश्वचषकादरम्यान (World Cup 2023) पाकिस्तानच्या (Pakistan) अनेक माजी खेळाडूंनी भारतीय क्रिकेट संघाबाबत (Indian Cricket Team) परस्परविरोधी वक्तव्य केलेली. काही लोकांनी नाणेफेकीवरुन वाद घातला, तर काहींनी टीम इंडियाला (Team India) वेगळा चेंडू दिला जात असल्याचं सांगितलं. टीम इंडियावर सातत्यानं आरोप करणाऱ्यांना आता टीम इंडियाच्या हुकुमी एक्क्यानं सडेतोड उत्तर दिलं आहे. टीम इंडियाचा धुरंदर मोहम्मद शामीनं (Mohammed Shami) सर्वांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एका मुलाखतीत बोलताना शामी म्हणाला की, "मी कोणाला दोष देत नाही, मी फक्त प्रार्थना करतो की, आणखी 10 लोक येतील आणि असं परफॉर्म करतील. मला कधीच कोणाबाबत इर्षा वाटत नाही. जर तुम्ही इतरांच्या यशाचा आनंद घ्यायला शिकलात, तर मला वाटतं की, तुम्ही खूप चांगले खेळाडू व्हाल. मी काहीही करत नाही, फक्त जे काही माझ्याकडे आहे ती परमेश्वराची देण आहे."


मोहम्मद शामी पुढे काय म्हणाला? 


मोहम्मद शामीला त्याचं म्हणणं आणखी सविस्तरपणे समजावून सांगण्यास सांगितलं. त्यावेळी तो म्हणाला की, "विश्वचषक सुरू असल्यानं अनेक दिवसांपासून ऐकू येत होतं. मी खेळत नव्हतो, जेव्हा खेळलो तेव्हा 5 विकेट घेतल्या. 4 विकेट्स घेतल्या आणि पुढच्या सामन्यात पुन्हा 5 विकेट घेतल्या. काही पाकिस्तानी खेळाडूंना ते पचत नसेल तर मी काय करावं? त्यांच्या मनात आपणच श्रेष्ठ आहोत, हेच बसलंय. पण मित्रांनो, बेस्ट तो असतो, जो ज्यावेळी खरी गरज असते, त्यावेळी चांगली खेळी करतो. जो मेहनत करतो, जो परफॉर्म करतो, जो संघासाठी उभा राहतो त्याच्यावर माझा विश्वास आहे."






मोहम्मद शामीनं सांगितलं की, "वसीम अक्रमनंही याबाबत खुलासा केला आहे. विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज शामी पुढे बोलताना म्हणाला की, आता तुम्ही त्यात वाद निर्माण करत आहात. सातत्यानं तेच तेच बोलता आहात. तुम्हाला दुसऱ्या रंगाचा बॉल मिळतोय. तुम्हाला दुसऱ्या कंपनीकडून बॉल मिळतायत. आयसीसीनं तुमच्यासाठी वेगळे नियम लागू केलेत. अरे मित्रांनो, सुधारा स्वतःला आणि वसीम अक्रमनंही हीच गोष्ट त्यांच्या एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितली आहे की, चेंडू बॉक्समध्ये कसा येतो, तो कसा निवडला जातो. कोणता संघ त्यासाठी सर्वात आधी जातो? त्यानंतरही जर हे असंच बोलणार असतील तर काय बोलणार?"


"एक खेळाडू असूनही असं बोलणं..."


पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू हसन रझा यानं वर्ल्डकपमध्ये वापरण्यात आलेल्या चेंडूबाबत वक्तव्य केलं होतं. याबाबत बोलताना शामी म्हणाला की, "तुम्ही खेळाडू नसतानाही त्या पातळीवर खेळला नाहीत, तरीही मुद्दा कळला. तू एक माजी खेळाडू आहेस, जर तू या सर्व गोष्टींबद्दल बोललास तर मला वाटत नाही की, लोक हसण्याशिवाय दुसरं काही करतील. मी बोलण्यात जरा कडवट आहे, हे मान्य. पण मला अशा गोष्टींवर बोलावंच लागेल."


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


'त्याच्या' आठवणीत फायनलमध्ये हातावर काळी पट्टी बांधून खेळला मिचेल स्टार्क; ऐकाल तर तुमचेही डोळे पाणावतील!