IPO Updates: यंदाच्या आठवड्यात 6 आयपीओ (IPO) बाजारात दाखल होणार आहेत. टाटासह (TATA Group) 6 कंपन्यांचा आयपीओ या आठवड्यात शेअर बाजारात येणार आहे. आयपीओच्या माध्यमातून तब्बल 7 हजार 300 कोटी रूपये उभारण्याचा 6 कंपन्यांचा मानस असल्याची माहिती मिळत आहे. टाटा टेक्नॉलॉजीज (Tata Technologies), इरेडा (Indian Renewable Energy Development Agency), गांधार ऑईल रिफायनरी (Gandhar Oil Refinery), फ्लेयर रायटिंग इंडस्ट्रीज (Flair Writing Industries), रॉकिंग डिल्स सर्क्युलर इकॉनॉमी (Rocking Deals Circular Economy) आणि फेडबॅंक फायनान्शिअल कंपन्यांचे आयपीओ बाजारात येणार आहे.
यंदाच्या आठवड्यात 6 आयपीओ बाजारात येणार आहेत. या सहा आयपीओच्या माध्यमातून कंपन्या जवळपास साडे सात हजार कोटींचा निधी उभारणार आहेत. टाटा टेक्नॉलॉजीज, इरेडा, गांधार ऑईल रिफायनरी, फ्लेयर रायटिंग इंडस्ट्रीज, रॉकिंग डिल्स सर्क्युलर इकॉनॉमी आणि फेडबॅंक फायनान्शिअल कंपन्यांचे आयपीओ बाजारात येणार आहेत. टाटा ग्रुपचा टाटा टेक आजपासून गुंतवणूकदारांसाठी खुला होणार असून ज्यात 24 नोव्हेंबरपर्यंत आयपीओसाठी अर्ज करता येईल. महत्त्वाचं म्हणजे टीसीएसनंतर टाटा ग्रुपचा 20 वर्षात पहिलाच आयपीओ येणार आहे.
टाटा ग्रुपचा टाटा टेक आजपासून गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे. ज्यात 24 नोव्हेंबरपर्यंत आयपीओसाठी अर्ज करता येणार आहे. टाटा टेकचा प्रति शेअर 475 ते 500 रुपये किंमत निश्चिती करण्यात आली आहे. टाटा टेकमध्ये ॲंकर इन्व्हेस्टर्सकडून जवळपास 800 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. टीसीएसनंतर टाटा ग्रुपचा 20 वर्षांत पहिलाच आयपीओ आहे. त्यामुळे अवघ्या बाजाराचं लक्ष या आयपीओकडे लागलं आहे. जागतिक बाजारातील भांडवली बाजारात अस्थिरतेचे वातावरण असताना भारतात मात्र चालू वर्षात आयपीओच्या माध्यमातून पैसे उभारण्याचा प्रयत्न सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे.
बहुप्रतिक्षित टाटा टेक्नॉलॉजी आयपीओचं आज लॉन्चिंग
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या Tata Technologies IPO आज लॉन्च होणार आहे. या आयपीओसाठी अर्ज करण्याची मुदत 24 नोव्हेंबर असून, कंपनीनं प्रति शेअर 475-500 रुपयांचा प्राईज बँड निश्चित केला आहे. टाटा समूहाच्या कंपनीचा यापूर्वीचा आयपीओ 19 वर्षांपूर्वी आला होता. त्यामुळे टाटा टेक्नॉलॉजीच्या आयपीओला कसा प्रतिसाद मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 20,000 कोटींहून अधिक बाजार मूल्य असलेली टाटा टेक्नॉलॉजी, एक अभियांत्रिकी सेवा कंपनी असून, ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे 3,042.51 कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम आयपीओतून उभारण्याचे त्यांनी लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :