Ram Mandir Vacancy : अयोध्येमध्ये (Ayodhya) भव्य राम मंदिराचं (Ram Temple) निर्माण काम प्रगतीपथावर आहे. दोन महिन्यानंतर राम मंदिरामध्ये रामलल्लाची स्थापना होणार आहे. 22 जानेवारीला राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या भव्य राम मंदिरात पुजारी पदांसाठी (Pujari Job) भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. राम मंदिरातील पुजारी (Pandit) पदांसाठी 3 हजार अर्ज प्राप्त झाले होते, त्यानंतर उमेदवारांची मेरिट लिस्ट जारी करण्यात आली आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून उमेदवारांची मुलाखत घेण्यास सुरुवात झाली आहे.
राम मंदिरतील पुजारी पदांसाठी 3 हजार अर्ज
अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरात पुजाऱ्यांच्या भरतीसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात आली असून त्यासाठी मुलाखतीही सुरू झाल्या आहेत. राम मंदिरातील पुजारी पदांसाठी एकूण तीन हजार जणांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यानंतर गुणवत्ता यादीच्या आधारे 225 मुलाखतीसाठी निवड करण्यात आली आहे. मुलाखतीत निवड झालेल्यांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिलं जाईल. त्यानंतर गरजेनुसार त्यांची नियुक्ती केली जाईल.
200 उमेदवारांची मेरिट लिस्ट
राम मंदिर ट्रस्टला मिळालेल्या 3000 अर्जांपैकी 225 उमेदवारांची त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर निवड करण्यात आली असून त्यांना ट्रस्टने मुलाखतीसाठी बोलावलं आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांनी सांगितले की, वृंदावनचे प्रसिद्ध हिंदू धर्मोपदेशक जयकांत मिश्रा यांचाही मुलाखतकारांच्या तीन सदस्यीय पॅनेलमध्ये समावेश आहे. त्यांनी सांगितले की, मुलाखतकारांचे तीन सदस्यीय पॅनल अयोध्येतील विश्व हिंदू परिषदेचे मुख्यालय कारसेवक पुरम येथे या निवडक उमेदवारांची मुलाखत घेत आहे.
मुलाखतीद्वारे होणार 20 जणांची निवड
मुलाखतकारांच्या तीन सदस्यीय पॅनेलमध्ये वृंदावनचे प्रसिद्ध हिंदू धर्मोपदेशक जयकांत मिश्रा आणि अयोध्येचे दोन महंत, मिथिलेश नंदिनी शरण आणि सत्यनारायण दास यांचा समावेश आहे. मुलाखतीद्वारे निवडलेल्या 20 उमेदवारांना अयोध्येतील पुरम येथे सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिलं जाईल. हे प्रशिक्षण धार्मिक अभ्यासक्रमावर आधारित असेल. प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना मोफत राहण्याची सोय आणि भोजन मिळेल, तसेच दोन हजार रुपये मानधन दिलं जाईल.
एका दिवशी 75 हजार भाविकांना दर्शन मिळणार
26 जानेवारीपासून राम मंदिर भक्तांसाठी खुले केले जाईल, त्यानंतर रामभक्तांना प्रभू श्रीरामाचे दर्शन घेता येणार आहे. अयोध्येतील राम मंदिरात दररोज सुमारे 75 हजार भाविक दर्शन घेऊ शकतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :