देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील
सुदानमधील 360 भारतीयांची पहिली तुकडी नवी दिल्लीत दाखल
अंतर्गत संघर्षग्रस्त सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांपैकी 360 जण रात्री नवी दिल्ली विमानतळावर दाखल झाले. सुदानमध्ये जवळपास तीन हजार भारतीय अडकले आहेत. त्यांना सुखरुप परत आणण्यासाठी भारत सरकारकडून ऑपरेशन कावेरी राबवलं जातंय. अडकलेल्या भारतीयांना आधी जहाजानं सौदीची राजधानी जेद्दाहमध्ये (Jeddah) आणावं लागंत,आणि मग तिथून हवाई मार्गे त्यांना भारतात आणलं जातं. वाचा सविस्तर
दिल्ली सरकारची मोठी घोषणा, 56 एकरवर होणार पहिलं पशुवैद्यकीय महाविद्यालय
दिल्लीत लवकरच पहिले पशुवैद्यकीय महाविद्यालय (College of Veterinary) सुरु होणार असल्याची माहिती वन आणि वन्यजीव, विकास आणि सामान्य प्रशासन मंत्री गोपाल राय (Minister Gopal Rai) यांनी दिली. 56 एकर क्षेत्रावर हे पशुवैद्यकीय महाविद्यालय बांधले जाणार आहे. वाचा सविस्तर
प्रियंका गांधींना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावं, काँग्रेसच्या 'या' नेत्याची मागणी
काँग्रेसकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असवा याबाबत सातत्यानं चर्चा सुरु आहेत. अशातच काँग्रेसचे नेते प्रमोद कृष्णम यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. विरोधी पक्षांनी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावं अशी मागणी प्रमोद कृष्णम यांनी केली आहे. वाचा सविस्तर
ब्राझीलमध्ये टेलीग्रामवर बंदी, प्रायव्हसी आणि राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात
ब्राझीलमध्ये टेलीग्रामवर बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेचं देण्यात कारण देत ब्राझीलमध्ये देशभरात टेलीग्रामवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. टेलीग्रामच्या पॅरेंट कंपनीवर देशात कार्यरत असलेल्या दहशतवादी आणि नवनाझी गटांशी संबंधित संघटनांची माहिती लपवल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाचा सविस्तर
अमेरिकेतही धूमधडाक्यात दिवाळी साजरी होणार, पेनसिल्व्हेनियामध्ये अधिकृत सुट्टी जाहीर
भारतासह जगभरात दिवाळी हा सण उत्साहात साजरा केला जात. मागील वर्षी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनीही मोठ्या थाटामाटात दिवाळी साजरी केली होती. आता दिवाळीची लोकप्रियता पाहून, युनायटेड स्टेट्स ऑफ पेनसिल्व्हेनियाने दिवाळीला राष्ट्रीय सुट्टी घोषित केली आहे. सिनेटर निकिल सावल यांनी बुधवारी (26 एप्रिल) ट्वीट करुन ही माहिती दिली. वाचा सविस्तर
या' राशींसाठी आजचा दिवस भाग्याचा, फक्त 'हे' काम करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आज गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. कन्या राशीच्या ज्येष्ठांशी संवाद साधताना शब्द काळजीपूर्वक बोलले तर बरे होईल. तर, कुंभ राशीच्या लोकांसाठी राजकारणात चांगली संधी आहे. आजचा गुरुवार मेष ते मीन राशीसाठी कसा राहील? काय सांगतात तुमचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर
सहकारमहर्षी विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील, अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन; आज इतिहासात..
इतिहासात प्रत्येक तारखेचे महत्त्व असते. 27 एप्रिल ही तारीख भारताच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. मामा वरेरकर ह्या नावाने विशेष प्रसिद्ध असलेले नाटककार भार्गवराम विठ्ठल वरेरकर यांचा जन्म दिवस आहे. तर, ज्येष्ठ अभिनेते, माजी केंद्रीय मंत्री विनोद खन्ना यांचा स्मृतीदिन आहे. महाराष्ट्रात सहकाराची मुहूर्तमेढ रोवणारे पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील यांचाही स्मृतीदिन आहे. वाचा सविस्तर