Priyanka Gandhi Tries to Make Dosa: सध्या कर्नाटकात (Karnataka Election 2023) निवडणूकांचे वारे वाहत आहे. प्रत्येक पक्षाचा प्रचार (Election Campaing) अगदी जोरदार सुरू असल्याचं चित्र कर्नाटकात पहायला मिळतयं. कॉंग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा (Priyanka Gandhi) देखील या प्रचारात सहभागी झाल्या आहेत.
गांधी कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून बऱ्यापैकी चर्चेत आहे. राहुल गांधींची रद्द केलेली खासदारकी आणि अशा अने क घटना गांधी कुटुंबाच्या बाबतीत घडल्या आहेत. परंतु तरीही राजकारणासाठी किंवा पक्षासाठी नेहमीच कार्यरत असल्याचं पहायला मिळत आहे. आतासुद्धा प्रियंका गांधींचा एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये प्रियंका गांधी आपल्या हातांनी डोसे चक्क डोसे बनवत आहेत.
पण त्यांनी या प्रचारादरम्यान एक वेगळा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं. प्रियंका गांधींनी म्हैसूरच्या मैलारी अग्रहारा या रेस्टॉरंटमध्ये आपल्या हातांनी डोसे बनवण्याचा प्रयत्न केला आहे. इतकचं नाही तर त्यांनी तिथे बसून लहान मुलांसोबत तेथे डोसे खाण्याचा आनंदही घेतला. यावेळी त्यांच्यासोबत कर्नाटकचे कॉंग्रसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार, कर्नाटकाचे कॉंग्रेसचे प्रभारी रणदीप सिंह सूरजेवाला यांदेखील त्याच्यासोबत मैलारी अग्रहारा येथे डोसे खाण्याचा आनंद घेतला. प्रियंका गांधी यांनी म्हैसूरमधील रॅडीसन ब्लू या हॉटेलमध्ये मुक्काम केला.
काय म्हणाल्या प्रियंका गांधी...
प्रियंका गांधींनी तिथल्या लोकांशी देखील संवाद साधला. तसेच त्यांनी तिथल्या डोशाचे कौतुक करत खूप चविष्ट असल्याचं सांगितलं. तसेच यावेळी त्यांना इंदिरा गांधींविषयीच्या आठवणींना देखील उजाळा दिला. त्या म्हणाल्या की,'इंदिरा गांधींनी कधीच लोकांचा विश्वास मोडला नाही.' 'इंदिरा गांधी या लोकांच्या मनाशी जोडल्या गेल्या होत्या, आणि आता जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर तोही केवळ इंदिरा गांधींमुळे आहे' असं देखील प्रियंका गांधी लोकांशी संवाद साधताना म्हणाल्या.
प्रियंका गांधींचा भाजपावर निशाणा..
प्रियंका गांधींनी यावेळी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्यावर देखील निशाणा साधला. 'गेल्यावर्षी लोकांनी कॉंग्रेसला निवडून दिले परंतु भाजपाने पैशाने सत्ता जिंकून घेतली.' तसेच कर्नाटक सरकाने लोकांनी लुबाडल्याचा आरोपही प्रियंका गांधीनी केला आहे.
'कर्नाटकात आता बदल घडवण्याची गरज'...
कर्नाटकात आता बदल घडवून आणण्याची गरज आहे. 'भाजपाने गेल्या काही वर्षात कोणतेही विकासाचे काम केले नाही' असा आरोपही प्रियंका गांधींनी भाजपावर केला आहे. गेल्या तीन वर्षात कर्नाटकात काहीच विकास झाल्याचं देखील विधान प्रियंका गांधींनी केलं आहे.
हे देखील वाचा: