Sudan Operation Kaveri: संघर्षग्रस्त सुदानमधून भारतीयांची सुटका करण्यासाठी सरकारनं ऑपरेशन कावेरी सुरू केलं आहे.. सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांची पाचवी तुकडी INS तेग (INS Teg) 297 प्रवाशांसह सुदानहून रवाना झाली आहे. याबाबत माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट केले की, सुदानमधून सुखरूप आणलेल्या भारतीयांची ही पाचवी तुकडी आहे. . अरिंदम बागची यांनी ट्विट केले आहे की, "#ऑपरेशन कावेरी (Operation Kaveri) सुरूच आहे. संघर्षग्रस्त सुदानमधून आपल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी भारताने सोमवारी ऑपरेशन कावेरी सुरू केले."
अंतर्गत संघर्षग्रस्त सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांपैकी 360 जण रात्री नवी दिल्ली विमानतळावर दाखल झाले. सुदानमध्ये जवळपास तीन हजार भारतीय अडकले आहेत. त्यांना सुखरुप परत आणण्यासाठी भारत सरकारकडून ऑपरेशन कावेरी राबवलं जातंय. अडकलेल्या भारतीयांना आधी जहाजानं सौदीची राजधानी जेद्दाहमध्ये (Jeddah) आणावं लागंत,आणि मग तिथून हवाई मार्गे त्यांना भारतात आणलं जातं. आतापर्यंत पाच तुकड्यांमध्ये एकूण 967 भारतीयांना सुखरुप परत आणण्यात आलं आहे. सर्व देशांच्या नागरिकांना मायदेशी नेता यावं म्हणून सुदानमध्ये तीन दिवस युद्धबंदी घोषित करण्यात आली आहे.
पहिल्या तुकडीत 278 भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुदानमध्ये लष्कर आणि निम लष्करी दलामध्ये संघर्ष सुरू आहे. यामध्ये अनेक ठिकाणी बॉम्ब हल्ले केले जात आहेत. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या संघर्षात आतापर्यंत 400 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच, तीव्र उन्हाळ्यात अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. सुदान सरकारशी संपर्क साधून भारतानं ऑपरेशन कावेरी सुरू केलं आहे. पुढील काही दिवसांत सर्व भारतीय नागरिकांना सुखरुप परत आणण्यात येणार आहे. सुदानमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि मालमत्तेची हानी झाली आहे.
अन्नपाण्याविना अधिक मृत्यू होतील, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) व्यक्त केली भीती
सुदानमध्ये प्रत्यक्ष संघर्षामुळे होणाऱ्या जीवितहानीपेक्षा अन्न-पाण्याचा अभाव, आणि मुलभूत आरोग्य सेवांच्या तुटवड्यामुळे अधिक मृत्यू होतील, अशी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) व्यक्त केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :