Delhi Government : दिल्लीत लवकरच पहिले पशुवैद्यकीय महाविद्यालय (College of Veterinary) सुरु होणार असल्याची माहिती वन आणि वन्यजीव, विकास आणि सामान्य प्रशासन मंत्री गोपाल राय (Minister Gopal Rai) यांनी दिली. 56 एकर क्षेत्रावर हे पशुवैद्यकीय महाविद्यालय बांधले जाणार आहे. मंत्री गोपाल राय यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (26 एप्रिल) पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. यामध्ये हा निर्णय घेतला. 


'दिल्ली पशू कल्याण मंडळ' स्थापना


दिल्ली सरकारच्या (Delhi Government) वतीन ' दिल्ली पशू कल्याण मंडळ' (Animal welfare board) स्थापन करण्यात आलं आहे. 19 श्रेणींमध्ये याची विभागणी करण्यात येणार आहे. यामध्ये एकूण 27 सदस्य समाविष्ट असतील. हे मंडळ प्राण्यांच्या संदर्भात काम करेल अशी माहिती मंत्री गोपाल राय यांनी दिली. यासोबतच दिल्लीतील प्रत्येक जिल्ह्यात प्राणी कल्याण कार्यात सहभागी असलेल्या संस्थांना बोर्डाकडून आर्थिक आणि तांत्रिक मदतही दिली जाईल. याशिवाय मंत्री गोपाल राय यांनी दिल्लीतील पहिल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाला गती देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. दिल्लीतील सातबारी येथे 56  एकर जागेवर पशुवैद्यकीय महाविद्यालय बांधले जाणार आहे. दिल्ली पशू कल्याण मंडळ हे दिल्लीतील प्राणी कल्याणाशी संबंधित कायद्यांचे कठोर पालन सुनिश्चित करेल. या कामात सहभागी असलेल्या संस्थांना मदत करण्यासाठी काम करणार असल्याची माहिती राय यांनी दिली.


पशुवैद्यकीय विज्ञान ही काळाची गरज 


पशुवैद्यकीय विज्ञान ही आगामी काळाची मोठी गरज असल्याचे मत दिल्लीचे मंत्री गोपाल राय यांनी सांगितले. कारण ते केवळ गुरांसंदर्भात किंवा पाळीव प्राण्यांच्या आरोग्याचे रक्षण करत नाही तर अन्य रोगांची तपासणी आणि नियंत्रण करुन मानवी आरोग्याचे रक्षण करते. दिल्लीत मोठ्या संख्येने पाळीव प्राणी आहेत, ज्यांना आरोग्य सेवा पुरवणे आवश्यक आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या प्राण्यांवर उत्तम उपचार करण्यासाठी शहरातील पहिल्या शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती राय यांनी सांगितली. त्याचे बांधकाम पूर्ण होताच दिल्लीत पहिले सरकारी पशुवैद्यकीय महाविद्यालय देखील सुरु होईल. हे महाविद्यालय आधुनिक प्रशिक्षण सुविधांनी सुसज्ज असेल असेही मंत्री राय यांनी सांगितलं. तसेच दिल्लीतील प्रत्येक जिल्ह्यात प्राणी कल्याण कार्यात सहभागी असलेल्या संस्थांना बोर्डाकडून आर्थिक आणि तांत्रिक मदतही दिली जाणार असल्याचे मंत्री म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


Turkey Bird Viral Video : पशू-पक्षांना आधीच लागते संकटाची चाहूल? भूकंपाआधी तुर्कीमध्ये पक्षांचा विचित्र आवाज, घिरट्या घालतानाचा व्हिडीओ व्हायरल