Brazil Ban Telegram App: ब्राझीलमध्ये (Brazil) टेलीग्रामवर बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेचं देण्यात कारण देत ब्राझीलमध्ये देशभरात टेलीग्रामवर (Telegram) तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. टेलीग्रामच्या पॅरेंट कंपनीवर देशात कार्यरत असलेल्या दहशतवादी आणि नवनाझी गटांशी संबंधित संघटनांची माहिती लपवल्याचा आरोप करण्यात आला आहे. 
 
ब्राझीलमधील नवनााझी गटांशी संबधित संघटनांवर नजर आहे. ब्राझीलने या संघटनांशी संबंधित महिती लपवल्याचा आरोप टेलिग्रामवर करत त्यांना दंड ठोठावला आहे. ब्राझिलने  टेलिग्रामला दररोज 198,000 डॉलर म्हणजे 1 कोटी 61 लाख रुपये दंड ठोठावला आहे. ही माहिती ब्राझीलचे न्यायमंत्री फ्लेवियो डिनो यांनी पत्रकारांना ही माहिती दिली आहे.  


ब्राझीलचे न्यायमंत्री   फ्लेवियो डिनो यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, टेलिग्रामवर अँटी सेमिटिक फ्रंट आणि अँटी सेमिटिक मूव्हमेंट नावाचा समूह कार्यरत आहे. या समुहाचे लक्ष्य लहान मुले आहे. हा समूह लहान मुलांना हिंसेस प्रवृत्त करतो. मुलांमध्ये हिंसाचार वाढवण्यातही त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. याचे ताजे उदाहरण या महिन्याच्या सुरुवातीला पाहायला मिळाले आहे. एका व्यक्तीने चार ते सात वयोगटातील चार मुलांवर कोयत्याने वार केले. गेल्या महिन्यात साओ पाउलो येथील एका शाळेत 13 वर्षाच्या विद्यार्थ्याने चाकूने हल्ला करत एका शिक्षकाची हत्या केली.






ब्राझीलमधील लहान मुलांमधील वाढता हिंसाचार तसेच गुन्हेगाराीची घटनांना पाहता टेलीग्रामवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात 16 वर्षाच्या शूटरने दक्षिण पूर्व भागातील एस्पिरिटो सेंटो आणि अराक्रुज येथील दोन शाळांवर केलेल्या हल्ल्यात चार जणांचा खून केला. या घटनेमध्ये 10 पेक्षा अधिक जण जखमी होते. त्यामुळे अशा घटनांना  आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.  टेलीग्राममुळे ब्राझीलची प्रायव्हसी आणि राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आली आहे.


टेलिग्राम सहकार्य करत नसल्याचा आरोप


एस्पिरिटो सेंटो येथील फेडरल जस्टिस अथॉरिटीच्या एका दस्तावेजानुसार टेलिग्राम (Telegram) सहकार्य करत नसल्याचा आरोप केला आहे.  या दस्ताऐवजानुसार कंपनीने केवळ एका ग्रुपच्या  अॅडमिनिस्ट्रेटरची माहिती दिली आहे. टेलिग्रामकडे तपास यंत्रणांनी दोन यहूदी-विरोधी समुहाच्या सदस्यांची माहिती मागितली आहे


इतर महत्त्वाच्या बातम्या :


WhatsApp Update : व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी आणलं भन्नाट फिचर, आता एक अकाऊंट चार मोबाईलमध्ये वापरता येणार!