देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील. 


शाहरुख, सलमान, कोहली, धोनी, अजित पवार, राहुल गांधी, काँग्रेस-भाजप, जाणून घ्या कोणाच्या अकाऊंटवरुन ब्लू टिक हटवले!


मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने  लेगसी व्हेरिफाईड अकाऊंटवरुन ब्लू टिक  काढून टाकली आहे. म्हणजे असे हॅण्डल ज्यांना ट्विटरची सशुल्क सेवा न घेता ब्लू टिक मिळाले होते. त्या अकाऊंटवरुन आता ब्लू टिक हटवण्यात आली आहे. यामध्ये अभिनेते, खेळाडू, राजकारणी यांचा समावेश आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन , शाहरुख खान , सलमान खान , अक्षय कुमार ते क्रिकेटपटू विराट कोहली  यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ब्लू टिक हटवण्यात आली आहे.
 वाचा सविस्तर  


 हवामान बदल हे सर्वात मोठं आव्हान, संयुक्त कृती आवश्यक; जगातील महत्त्वाच्या नेत्यांकडून चिंता व्यक्त 


 हवामान बदल  हे सर्वात मोठे आव्हान असल्याचे मत देशातील महत्त्वाच्या नेत्यांनी व्यक्त केलं आहे. अमेरिका सरकारनं  गुरुवारी (20 एप्रिल) प्रमुख अर्थव्यवस्थांच्या उर्जा आणि हवामान या विषयाशी संबंधित मंचातील नेत्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत हवामान बदलाविषयी चिंता व्यक्त करण्यात आली.  वाचा सविस्तर


जम्मू आणि काश्मीरच्या पूँछमध्ये लष्करावर दहशतवादी हल्ला; पाच जवान शहीद,  जवानांची नावं भारतीय लष्कराकडून जाहीर


भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये गुरुवारी (20 एप्रिल) ट्रकवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात  शहीद झालेल्या पाच जवानांची नावे जाहीर केली आहेत. हवालदार मनदीप सिंह, लान्स नायक देबाशिष बसवाल, लान्स नायक कुलवंत सिंह, शिपाई हरकृष्ण सिंह आणि शिपाई सेवक सिंह अशी मृत जवानांची नावे आहेत, असं नागरोटा इथल्या लष्कराच्या 16 कॉर्प्सने सांगितलं.  वाचा सविस्तर  


ढोबळी मिरचीला एक रुपयांचा दर, पंजाबमधील शेतकरी आक्रमक; व्हिडीओ व्हायरल 


 सध्या ढोबळी मिरचीच्या  दरात मोठी घट झाली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. पंजाबमध्ये सध्या ढोबळी मिरचीला प्रति किलोला एक ते दीड रुपयांचा दर मिळत आहे. दरात घसरण झाल्यामुळं शेतकरी आक्रमक झाले आहेत. पंजाबमधील  शेतकरी रस्त्यावर ढोबळी मिरची फेकून सरकारचा निषेध व्यक्त करताना दिसत आहे. याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मानसा  जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आहे.  वाचा सविस्तर


अॅपल स्टोअरमध्ये फिल्मी स्टाईल चोरी, तब्बल चार कोटींच्या रक्कमेसह 436 आयफोन लंपास


अमेरिकेतील सिएटल येथील अॅपल (Apple)  स्टोअरमधून चोरट्यांनी फिल्मी स्टाईलमध्ये 4.10 कोटी रुपये किमतीचे 436 आयफोन लुटले.  अमेरिकन वेब सिरीज 'मनी हेस्ट' किंवा 'ओशन्स इलेव्हन' हा चित्रपट पाहिला असेलच, त्याच धर्तीवर चोरांनी अॅपल स्टोअरच्या शेजारी असलेल्या कॉफी शॉपचा वापर करून अॅपल स्टोअरची सुरक्षा यंत्रणा तोडून त्याच्या मागील खोलीत प्रवेश केला. बाथरूमची भिंत फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर सुमारे 50,000 डॉलर म्हणजेच सुमारे 4.10 कोटी रुपये किमतीचे 436 आयफोन  लंपास केले.  वाचा सविस्तर 


 मेष, धनु, मीन राशीच्या लोकांना सतर्कतेचा इशारा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य 


आज शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. मेष राशीच्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल, त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तसेच, मिथुन राशीचे वैवाहिक जीवन सुखकर राहील. मेष ते मीन राशीसाठी कसा असेल शुक्रवारचा दिवस? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.