Agriculture News : सध्या ढोबळी मिरचीच्या (capsicum) दरात मोठी घट झाली आहे. याचा शेतकऱ्यांना (Farmers) मोठा आर्थिक फटका बसत आहे. पंजाबमध्ये सध्या ढोबळी मिरचीला प्रति किलोला एक ते दीड रुपयांचा दर मिळत आहे. दरात घसरण झाल्यामुळं शेतकरी आक्रमक झाले आहेत. पंजाबमधील (Punjab) शेतकरी रस्त्यावर ढोबळी मिरची फेकून सरकारचा निषेध व्यक्त करताना दिसत आहे. याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मानसा (Mansa) जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आहे.
पंजाबमधील अनेक शेतकऱ्यांनी ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतलं आहे. मात्र, सध्या ढोबळी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण अचानक मिरचीच्या दरात घट झाली आहे. प्रतिकिलोसाठी केवळ एक ते दीड रुपयांचा दर मिळत आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पंजाबमधील शेतकरी गहू-तांदूळ ही पारंपरिक पिके सोडून अन्य पिके घेत आहेत. सरकारनं देखील शेती पिकात बदल करण्याचं आवाहन शेतकऱ्यानं केलं होतं. त्यानुसारच शेतकऱ्यांनी ढोबळी मिरचीचं उत्पादन घेतलं आहे. मात्र, सध्या दर नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.
शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण
मानसामध्ये शेतकऱ्यांनी भटिंडा-चंदीगड मुख्य रस्त्यावर ढोबळी मिरची फेकली. साधारणपणे ढोबळी मिरचीला प्रतिकिलोसाठी 15 ते 20 रुपयांचा दर मिळतो. मात्र, यावेळी शेतकऱ्यांना एक ते दिड रुपयांचा दर मिळत आहे. यामुळेच आता शेतकऱ्यांनी मिरची रस्त्यावर फेकूण निषेध व्यक्त केला आहे. योभाजीपाला उत्पादकांना बाजारात योग्य दर मिळत नसल्याची माहिती पंजाब किसान युनियनचे राज्य उपाध्यक्ष गोरा सिंग भाई बाघा यांनी सांगितले. ढोबळी मिरचीला मिळणाऱ्या दरात शेतकऱ्यांचा खर्च देखील निघत नसल्याचे शेतकरी गोरा सिंग म्हणाले. पंजाबमधील भैनीबाघा गावातील शेतकरी गहू आणि तांदळाची पारंपारिक शेती सोडून पर्यायी शेतीकडे वळले आहेत. काही वर्षे शेतकऱ्यांना या पिकातून चांगला नफा मिळाला. मात्र, नोटाबंदी आणि त्यानंतर आलेल्या कोरोना महामारीमुळं शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागल्याचे गोरा सिंग म्हणाले.
सरकारनं भाजीपाला उत्पादकांना सोबत घेऊन मार्केटिंगची व्यवस्था करावी
भारतीय किसान युनियनचे जिल्हा प्रमुख राम सिंह म्हणाले की, सरकारनं भाजीपाला उत्पादकांना सोबत घेऊन मार्केटिंगची व्यवस्था करावी. गाड्यांमधून वाहतुकीवर सबसिडी द्यावी आणि बियाणे आणि पॉलिथिनवरही सबसिडी द्यावी, असे ते म्हणाले. पूर्वी व्यापारी मानसाची शिमला मिरची जम्मू-काश्मीर, हिमाचल, राजस्थान, दिल्ली, हैदराबाद, यूपी येथे नेत असत. परंतु, ढोबळी मिरचीच्या अधिक उत्पादनामुळं भाव घसरले आहेत. सध्या व्यापारी देखील मिरचीची खरेदी करण्याकडे पाठ फिरवतीत असल्याचं चित्र दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: