Twitter Blue Tick Removed : मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने (Twitter) लेगसी व्हेरिफाईड अकाऊंटवरुन ब्लू टिक (Blue Tick) काढून टाकली आहे. म्हणजे असे हॅण्डल ज्यांना ट्विटरची सशुल्क सेवा न घेता ब्लू टिक मिळाले होते. त्या अकाऊंटवरुन आता ब्लू टिक हटवण्यात आली आहे. यामध्ये अभिनेते, खेळाडू, राजकारणी यांचा समावेश आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), शाहरुख खान (Shah Rukh Khan), सलमान खान (Salman Khan), अक्षय कुमार (Akshay Kumer) ते क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli), महेंद्रसिंह धोनी (M S Dhoni) आणि भारतीय राजकारणातील मोठी नावे जसं की महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ब्लू टिक हटवण्यात आली आहे.


खरंतर, ट्विटरचे मालक इलॉन मस्क (Elon Musk) यांनी 12 एप्रिललाच घोषणा केली होती की 20 एप्रिलपासून सर्व लेगसी व्हेरिफाईड अकाऊंटचे ब्लू टिक काढून टाकले जातील. आता फक्त अशा लोकांनाच ही सुविधा मिळणार आहे, जे ब्लू टिकसाठी पैसे खर्च करुन मासिक योजना घेतील. यानंतर, 20 एप्रिलच्या रात्री 12 वाजता, अशा सर्व अकाऊंटचे ब्लू टिक काढून टाकण्यात आले.


ट्विटरची याआधी पॉलिसी काय होती?


यापूर्वी, ट्विटर राजकारणी, अभिनेते, पत्रकारांसह सेलिब्रिटींच्या अकाऊंटला ब्लू टिक देत असे. यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नव्हते, मात्र इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर कंपनीने अनेक मोठे बदल केले आहेत.


ब्लू टिक पेड सर्विस म्हणजे काय?


यातील बदल म्हणजे ब्लू टिक पेड सर्विस अर्थात सशुल्क सेवा. ज्यांना ब्लू टिक आहे त्यांना त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. सुरुवातीला ही सेवा यूएस, यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर आता याची भारतातही सुरुवात झाली आहे. या अंतर्गत, या सेवेसाठी पैसे देणाऱ्यांनाच त्यांच्या अकाऊंटवर ब्लू टिक मिळू शकते.


आता ब्लू टिक कसे मिळवायचे? 


जर एखाद्या युझरला ब्लू टिक हवी असेल किंवा आधीच मिळालेली ब्लू टिक कायम ठेवायची असेल तर त्याला ट्विटर ब्लूचे सदस्यत्व घ्यावे लागेल. भारतात ट्विटर ब्लूचे सबस्क्रिप्शन रु. 650 पासून सुरु होते. मोबाईल युझरसाठी ते दरमहा 900 रुपये आहे.


 




 




 




हेही वाचा


Twitter चा यूजर्सना झटका! पेड सबस्क्रिप्शन नसणाऱ्यांचं ब्लू टिक हटवणार, 1 एप्रिलपासून नवे नियम लागू