एक्स्प्लोर

नैऋत्य मोसमी वारे अंदमानात दाखल, मान्सूनने बंगालच्या उपसागराचा भाग व्यापला

मान्सूनने अंदमानात धडक दिली असून, तिथे पावसाला सुरुवात झाली आहे. मान्सूनने दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे, बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

नवी दिल्ली : मान्सूनने अंदमानात धडक दिली असून, तिथे पावसाला सुरुवात झाली आहे. मान्सूनने दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे, बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. यंदा मान्सून केरळमध्ये 6 जूनला दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने तीन दिवसांपूर्वीच व्यक्त केला होता. त्यानूसार मान्सूनची वाटचाल सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. याआधी स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने यंदा मान्सून केरळमध्ये 4 जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे मान्सूनचं महाराष्ट्रातलं आगमन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, यंदा मान्सून भारतात येण्यासाठी उशिर होऊ शकतो. 6 जून रोजी मान्सून केरळच्या समुद्रकिनारी धडक देईल. मागील वर्षी 29 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता तर 2017 मध्ये 30 मे रोजी मान्सूनने केरळच्या किनाऱ्यावर वर्दी दिली होती. महाराष्ट्रातही पाऊस उशिराने दरवर्षी 7 जूनदरम्यान मान्सून महाराष्ट्रात वर्दी देतो. परंतु यंदा मान्सूनचे प्रवेशद्वार समजले जाणाऱ्या केरळमध्येच 6 जूनला आगमन होत असल्याने मान्सून महाराष्ट्रात आणखी उशिराने पोहोचेल, असं म्हटलं जात आहे. त्यामुळे सामान्य जनता आणि बळीराजाला पावसाची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. अल निनोचा प्रभाव कमी भारतीय हवामान विभागाने आपल्या पहिल्या अंदाजात सामान्य पावसाची अपेक्षा व्यक्त केली होती. यंदा अल निनोचा जोर कमी असेल आणि तो हळूहळू कमी होईल. यंदा सामान्य म्हणजेच 96 टक्के पावसाचा अंदाज आहे. यात 5 टक्के पाऊस कमी किंवा जास्त होऊ शकतो, असं आयएमडीने म्हटले होते. यंदा किती पाऊस पडणार? यंदा मान्सूनदरम्यान सामान्यपेक्षा अतिशय जास्त (110 टक्क्यांपेक्षा जास्त) पावसाची शक्यता 2 टक्के आहे, तर सामान्यपेक्षा जास्त (104-110 टक्के) पावसाची शक्यता 10 टक्के आहे. याशिवाय सामान्य म्हणजेच 96-104 टक्के पावसाची शक्यता 39 टक्के आहे. म्हणजेच एकत्रित सामान्य किंवा सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, सामन्यपेक्षा थोडा कमी म्हणजेच 90-96 टक्के पावसाची शक्यता 32 टक्के आणि 90 टक्क्यांपेक्षा कमी पावसाची शक्यता 16 टक्के आहे. मान्सूनदरम्यान जर 90 टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला तर दुष्काळ जाहीर होतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Embed widget