एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काही तासांतच मान्सून केरळमध्ये वर्दी देणार!
नवी दिल्ली : पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या देशवासियांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण मान्सूनचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. काही तासातच मान्सून देवभूमी अर्थातच केरळमध्ये वर्दी देईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
केरळमध्ये पाऊस येण्यास पोषक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे हवामान विभागाच्या अंदाजानुसार ही परिस्थिती पाहता आजच मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे.
मान्सून आज केरळच्या समुद्रकिनारी पोहोचेल आणि पुढील 24 तासात केरळच्या बहुतांश भागात तसंच तामिळनाडूमध्ये दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
यानंतर पुढील काही तासात मान्सूनची वाटचाल दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-लक्षद्विप बेटांचा परिसर, केरळचा बराच परिसर, तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालची खाडीच्या परिसरात होईल.
दरम्यान, राज्यात मान्सून वेगाने दाखल होईल. 2, 3 आणि 4 जून रोजी पावसाची शक्यता आहे, असा अंदाज कृषी हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे. शिवाय यावर्षी राज्यात सरासरीच्या 102 टक्के पाऊस होईल, असंही साबळे यांनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या
मान्सूनचं काऊंटडाऊन सुरु, काही तासात केरळात!
येत्या 48 तासात मान्सून देवभूमीत दाखल होणार
”मान्सून राज्यात वेगाने येणार, 2, 3 आणि 4 जूनला पावसाचा अंदाज”
मान्सून 30 मे रोजी केरळात!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement