एक्स्प्लोर

Rana Ayyub : गैरव्यवहाराचे आरोप निराधार, काल्पनिक; पत्रकार राणा अयुब यांचं स्पष्टीकरण

Rana Ayyub Money Laundering Case : : पत्रकार राणा अयुब यांची 1.77 कोटी रुपयांची संपत्ती ईडीनं जप्त केलीय. यावर राणा अयुब यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Rana Ayyub Money Laundering Case : : राजकीय नेत्यांपाठोपाठ आता पत्रकारही ईडीच्या रडारवर येऊ लागलेत. पत्रकार राणा अयुब (Rana Ayyub) यांची 1 कोटी 77 लाख रुपयांची संपत्ती ईडीनं जप्त केली आहे. ईडीचा फेरा सध्या राजकीय वर्तुळात तर चर्चेत असतोच. पण आता पत्रकारही त्या लिस्टवर दिसतायत. पत्रकार राणा अयुब यांची 1.77 कोटी रुपयांची संपत्ती ईडीनं जप्त केलीय. क्राऊड फंडिग साईटवरुन मिळवलेला मदतनिधी गैरपद्धतीनं वापरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आलीय.  यावर राणा अयुब यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

राणा अयुब यांच्याकडून सर्व आरोपांचे खंडन

राणा अयुब यांनी देणगी म्हणून मिळालेल्या निधीच्या गैरवापराच्या सर्व आरोपांचे खंडन केले आहे.  त्यांनी क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्म Ketto वर पैसे कसे उभे केले आणि त्यानंतर कसे खर्च केले याचे तपशील जारी केले आहेत.   राणा अयुब यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, माझ्यावरी आरोप निराधार, भ्रामक आणि काल्पनिक आहेत. त्यांनी सांगितलं आहे की, Ketto वर हाती घेतलेल्या माझ्या तीन मोहिमांमध्ये मी एकूण ₹2,69,44,679 (सुमारे 26.9 दशलक्ष) जमा केले होते. माझ्याद्वारे हाती घेतलेल्या मदत कार्यासंबंधातील सर्व बिले आणि पावत्या पुरवल्या आहेत. 

अयुब यांनी म्हटलं आहे की, कोविडच्या अनुभवावरून असे दिसून आले आहे की सध्याच्या वैद्यकीय पायाभूत सुविधांना पूरक अशी तातडीची गरज आहे. तात्पुरते कोविड हॉस्पिटल सुरू करण्याच्या माझ्या प्रयत्नांना खूप वेळ लागत होता. म्हणून मी रूग्णांच्या उपचारात मदत करण्यासाठी सार्वजनिक अनुदानीत हॉस्पिटलमध्ये देणगी देण्याचा निर्णय घेतला. 

राणा अयुब कोण आहेत

37 वर्षांच्या राणा अयुब या मोदी सरकारच्या प्रखर टीकाकार पत्रकार म्हणून ओळखल्या जातात. 2002 च्या गुजरात दंगलीवर गोध्रा फाईल्स या पुस्तकाच्या त्या लेखिका. शिवाय वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्रासाठी स्तंभलेखनाचंही काम त्या करतात. राणा अयुब यांच्याविरोधात सप्टेंबर 2021 मधे गाझियाबादमध्ये एक तक्रार दाखल करण्यात आली होती. हिंदू आयटी सेल या एनजीओचे संस्थापक विकास संक्रितायन यांनी अयुब यांनी मदतनिधी गोळा करुन त्याचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. त्याच आधारावर ईडीनं ही जप्तीची कारवाई केली आहे. 

राणा अयुब यांनी मदतनिधी कुटुंबासाठीच वापरल्याचा आरोप

2020 ते 21 या काळात तीन मोहीमांसाठी अयुब यांनी किटो या क्राऊड फंडिग साईटवरुन निधी गोळा केला. 
आसाम बिहार, महाराष्ट्रातल्या पुरासाठी मदत आणि झोपडपट्टीवासियांना मदत, कोरोना काळातली मदत मोहीम यासाठी त्यांनी हा फंड उभा केला
जवळपास 2 कोटी 69 लाख रुपयांचा मदतनिधी गोळा झाला
पण यातले 72 लाख स्वतच्या नावावर, 37 लाख बहिणीच्या खात्यात आणि 1 कोटी 60 लाख रुपये वडिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले
ज्या कामासाठी पैसे गोळा करण्यात आले ते प्रत्यक्षात त्यासाठी खर्च झालेच नाहीत असा आरोप
याच पैशातून 50 लाख रुपयांची एफडी  राणा अयुब यांनी केल्याचाही आरोप
74 लाख रुपये अयुब यांनी पीएम केअर फंड आणि सीएम रिलीफ फंडातही जमा केल्याचं दिसतंय.

काही बिलं खोटी असल्याचा तपास यंत्रणांचा दावा

31 लाख रुपये मदतीसाठी वाटल्याचा राणा अयुब यांचा दावा आहे, पण त्यांनी प्रत्यक्षात 17 लाख रुपयांचीच बिलं दिलं. काही बिलं खोटी असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. ईडीची कारवायांवरुन आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सतत पाहायला मिळतं. चूक घडल्यानंतर कारवाई होणारच हा भाजप नेत्यांचा दावा असतो तर केवळ विरोधकांवरच कारवाई कशी होते असं म्हणत विरोधक हल्लाबोल करतात. त्यात आता ही कारवाई पत्रकारांवरही होताना दिसतेय. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
Abhijeet Dipke :  NTA ने 47 अधिकाऱ्याना बडतर्फ केलं, अभिजीत दिपकेंनी एक फोटो पोस्ट केला अन् मोठा मेसेज दिला
NTA ने 47 अधिकाऱ्याना बडतर्फ केलं, अभिजीत दिपकेंनी एक फोटो पोस्ट केला अन् मोठा मेसेज दिला
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  

व्हिडीओ

Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
Embed widget