भारतातील मोबाईल युगाची पंचविशी; आजच्या दिवशी 1995 मध्ये 'या' दोन नेत्यांमध्ये पहिलं संभाषण
आज आपण सहजतेने मोबाईवर तासंतास बोलत असलो तरी, तेव्ही तेवढं शक्य नव्हतं. कारण मोबाईलवर बोलण्यासाठी इनकमिंग आणि आऊटगोईंग दोन्हीसाठी चार्ज लागत होता.

मुंबई : आज मोबाईल सेवेमुळे अख्ख जग जवळ आलंय. आजच्या दिवशी 25 वर्षापूर्वी या मोबाईल सेवेला सुरुवात झाली. 31 जुलै 1995 मोबाईलवरून पहिलं संभाषण झालं होतं. पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू आणि तत्कालीन केंद्रीय दूरसंचारमंत्री सुखराम यांच्या मोबाईलवरून पहिलं संभाषण झालं होतं.
आजच्या दिवशी 25 वर्षापूर्वी मोबाईल युगाची सुरुवात झाली. आज मोबाईल संवादाचं प्रमुख साधन बनलं आहे. मोबाईलमध्ये देशात नवी क्रांती झाली. त्यावेळी मोबाईलवरून संवाद साधने बरंच खर्चिक होतं. आज आपण सहजतेने मोबाईवर तासंतास बोलत असलो तरी, तेव्ही तेवढं शक्य नव्हतं. कारण मोबाईलवर बोलण्यासाठी इनकमिंग आणि आऊटगोईंग दोन्हीसाठी चार्ज लागत होता.
ज्योती बसू यांनी कोलकाताच्या रायटर्स बिल्डिंगमधून पहिला कॉल नवी दिल्लीतील दूरसंचार भवनमध्ये पहिला कॉल केला होता. भारतातील पहिली मोबाईल ऑपरेटिंग कंपनी मोदी टेल्स्ट्रा होती आणि या कंपनीच्या सर्व्हिसला मोबाईल नेटने ओळखलं जायचं. पहिला मोबाईल कॉल याच नेटवर्कवरुन केला गेला होता. मोदी टेल्स्ट्रा भारतातील मोदी ग्रुप आणि ऑस्ट्रेलियाच्या टेलिकॉम कंपनी टेल्स्ट्रा कंपनीचं ज्वॉईंट वेन्चर होतं. त्यावेळी 8 कंपन्यांना देशात सेल्यलर सर्विस प्रोव्हाईड करण्याची मंजुरी देण्यात आली होती, त्यापेकी ही एक कंपनी होती.























