Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांना दिलासा, न्यायालयाने रद्द केली तक्रार
Mithun Chakraborty : कोलकाता उच्च न्यायालयाने मिथुन चक्रवर्ती यांच्याविरोधातील तक्रार रद्द केली आहे. मिथुन यांच्यावर निवडणुकीदरम्यान प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करण्यात आला होता.
Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांनी बंगालच्या निवडणुकांदरम्यान चित्रपटातील संवाद वापरल्याची कबूली दिली. त्यानंतर या प्रकरणातील पुढील कोणताही पोलीस तपास अनावश्यक आणि त्रासदायक असेल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनी एका जाहीर सभेत त्याच्या चित्रपटातील संवाद बोलल्यामुळे विधानसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचार झाला, असा आरोप करणारा पोलीस खटला कोलकाता उच्च न्यायालयाने (Culcutta High Court) गुरुवारी रद्द केला. मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्यावर दाखल करण्यात आलेल्या या आरोपांच्या विरोधात कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती.
नेमका आरोप काय?
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान, मिथुन यांच्यावर प्रक्षोभक भाषण केल्याचे आरोप करत कोलकाता (Culcutta) येथे मानिकतल्ला पोलीस स्थानकात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्यामध्ये चक्रवर्ती यांनी 7 मार्च रोजी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत ‘‘मारबो एकहने लाश पोरबे शोशाने’ (मी तुम्हाला इथे मारल्यास तुझा मृतदेह स्मशानभूमीत पडेल)) आणि ‘ एक छोबोले चाबी’ (एकदा साप चावेल आणि तुमचा फोटो बनेल) अशी वक्तव्य केली, ज्यामुळंच राज्यात निवडणुकांनंतर हिंसा उसळली, असे आरोप लावले गेले.
मिथुन चक्रवर्ती यांनी त्याच दिवशी भाजपमध्ये प्रवेश केला होता. न्यायालयाने म्हटले आहे की, ''चक्रवर्ती यांनी केलेले संवाद मान्य केल्यामुळे, या प्रकरणाचा पुढील कोणताही पोलीस तपास अनावश्यक आणि त्रासदायक ठरेल.'' न्यायमूर्ती कौशिक चंदा यांनी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याने चित्रपट अभिनेत्याविरुद्ध येथील माणिकतल्ला पोलीस ठाण्यात दाखल केलेला आणि सियालदह येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात प्रलंबित असलेला खटला रद्द केला.
न्यायालयाने म्हटले की, ''राजकारणात चित्रपट कलाकारांचा सहभाग देशात नवीन नाही. चित्रपट कलाकार राजकीय सभांमध्ये सिनेमॅटिक संवाद बोलून मतदारांचे मनोरंजन करण्याचा आणि आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात हेही सर्वश्रूत आहे. हे प्रकरणही त्याला अपवाद नाही.''
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Omicron Variant : दिलासादायक बातमी! राजस्थानमधील सर्व 9 ओमायक्रॉन बाधित निगेटिव्ह
- Maharashtra Corona Update : राज्यात शुक्रवारी 789 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर सात जणांचा मृत्यू
- CDS Bipin Rawat Death: सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha