एक्स्प्लोर

Ramchandra Prasad Singh : पोलादाच्या भुकटीपासून तयार केलेल्या पहिल्या महामार्गाचं सूरतमध्ये लोकार्पण

टाकाऊ उत्पादन असलेल्या स्टील स्लॅगपासून तयार केलेल्या पहिल्या सहापदरी महामार्गाचे सूरतमध्ये लोकार्पण करण्यात आलं. केंद्रीय पोलाद मंत्री रामचंद्र प्रसाद सिंह यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला.

Ramchandra Prasad Singh : पोलाद निर्मिती प्रक्रियेतील टाकाऊ उत्पादन असलेल्या स्टील स्लॅगपासून (पोलादाची भुकटी) तयार केलेल्या पहिल्या  सहापदरी महामार्गाचे सूरतमध्ये लोकार्पण करण्यात आलं. केंद्रीय पोलाद मंत्री रामचंद्र प्रसाद सिंह यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला. गुजरातमधील सुरत येथील बंदराला शहराशी जोडणारा हा महामार्ग आहे. सर्व प्रकारच्या  कचऱ्याचे संपत्तीमध्ये रुपांतर करून चक्रीय अर्थव्यवस्था आणि संसाधन कार्यक्षमतेला चालना देण्याची गरज यावेळी मंत्री रामचंद्र प्रसाद सिंह यांनी व्यक्त केली.

जगभरात सर्व प्रकारच्या नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास होत असल्याने चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना देण्याची गरज पंतप्रधानांनी 15 ऑगस्ट 2021 च्या भाषणात व्यक्त केली होती. याची आठवण करुन देत सिंह यांनी यासंदर्भात विशेष उल्लेख यावेळी बोलताना केला. अशा परिस्थितीत, चक्रीय अर्थव्यवस्था ही काळाची मागणी आहे. या मागणीला आपल्या जीवनाचा एक भाग म्हणून अनिवार्य करणे आवश्यक असल्याचे सिंह म्हणाले. प्रक्रिया केलेल्या पोलादाचा 100 टक्के वापर करुन तयार केलेला हा रस्ता हे कचऱ्याचे संपत्तीत रुपांतर करण्याचे आणि पोलाद संयंत्रांची शाश्वतता सुधारण्याचे एक प्रत्यक्ष  उदाहरण असल्याचे मंत्री रामचंद्र प्रसाद सिंह म्हणाले.


Ramchandra Prasad Singh : पोलादाच्या भुकटीपासून तयार केलेल्या पहिल्या महामार्गाचं सूरतमध्ये लोकार्पण

बांधकामाचा खर्च कमी होण्यासही मदत

उत्पादन प्रक्रियेत वाया जाणाऱ्या घटकांमध्ये नैसर्गिक समुच्चय घटकापेक्षा चांगले गुणधर्म असतात. त्यामुळं रस्ते बांधणीत अशा सामग्रीचा वापर केल्यानं टिकाऊपणा तर वाढेलच शिवाय बांधकामाचा खर्च कमी होण्यासही मदत होईल. या रस्त्यापासून मिळालेल्या अनुभवाचा उपयोग बांधकामात या स्टील स्लॅगचा (पोलादाच्या भुकटीचा)  मोठ्या प्रमाणात  वापर करण्याच्या दृष्टीने तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्यासाठी केला जाईल,असे मंत्र्यांनी यावेळी सांगितले.


Ramchandra Prasad Singh : पोलादाच्या भुकटीपासून तयार केलेल्या पहिल्या महामार्गाचं सूरतमध्ये लोकार्पण

स्टील स्लॅगचे उत्पादन 2030 पर्यंत वाढणार 

रस्ते बांधणीसाठी, शेतीसाठी मातीची पोषक द्रव्ये आणि खतांना पर्याय म्हणून, रेल्वेसाठी खडी आणि हरित  सिमेंट तयार करण्यासाठी अशा सामग्रीचा वापर करण्याच्या दृष्टीने पोलाद मंत्रालय इतर सर्व पर्यायांचा शोध घेत आहे. पोलाद मंत्रालयाने पोलादाच्या  उत्पादना दरम्यान निर्माण होणाऱ्या विविध प्रकारच्या उप उत्पादनांच्या वापरासाठी अनेक संशोधन आणि विकास प्रकल्प आधीच मंजूर केले आहेत. त्यापैकी बहुतेकांना उत्तरदायी म्हणून मानले जात आहे. स्टील स्लॅग वापरुन तयार केलेला रस्ता देखील इतर प्रमुख पोलाद कंपन्यांसह मंत्रालयानं प्रायोजित केलेल्या संशोधन आणि विकास  प्रकल्पाचा भाग आहे. देशात विविध प्रक्रिया मार्गांच्या माध्यमातून स्टील स्लॅगचे उत्पादन 2030 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्ते बांधणीत स्टील स्लॅगचा वापर हा देशातील नैसर्गिक समुच्चय घटकांची  कमतरता भरुन काढेल.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat on Dhananjay Munde : कुणी भगवानगडावर गेलं म्हणून मुंडेंबाबत शिरसाटांची प्रतिक्रियाNamdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्रीGunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 वा हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 वा हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Embed widget