एक्स्प्लोर
गोव्यात भाजपला पाठिंबा देणाऱ्या पक्षांना मंत्रिपदं : सूत्र
पणजी : गोव्यात सत्ता स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा देणाऱ्या पक्षांना मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पक्ष आणि अपक्षांना दोन मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाला उपमुख्यमंत्रिपदासह दोन मंत्रिपद मिळणार आहे. मगोपचे सुदिन ढवळीवर यांच्याकडे गोव्याचं उपमुख्यमंत्रिपद सोपवण्यात येणार आहे. तर गोवा फॉरवर्ड फक्षाचे विजय सरदेसाई यांना सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
मनोहर पर्रिकरांचं गोव्यात ‘मुख्यमंत्री’ म्हणून कमबॅक
गोवा विधानसभेतील पक्षीय बलाबल
गोवा विधानसभेत काँग्रेसला 17, भाजपला 13, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाला 3, गोवा फॉरवर्ड पक्षाला 3, अपक्षांना 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळाली होती.
गोव्यात शिवसेनेचा दारुण पराभव, तीन उमेदवारांना एकूण 792 मतं
...तरच भाजपला पाठिंबा
काँग्रेस मोठा पक्ष ठरला असला तरी मनोहर पर्रिकर यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या अटीवर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि 2 अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजप आणि इतर पक्षांचे मिळून एकूण 21 आमदारांनी राज्यपालांसमोर सत्ता स्थापनेचा दावा केला.
भाजपने उत्तर प्रदेश, उत्तराखंड कमावलं, गोवा मात्र गमावलं
पर्रिकरांचा उद्या शपथविधी
दरम्यान, मनोहर पर्रिकर उद्या संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. घटनेनुसार, मनोहर पर्रिकर गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी संरक्षणंत्रिपदाचा राजीनामा देतील, असंही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं.
गोव्यात मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या सहा मंत्र्यांचा पराभव
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement