एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पीएनबी बँक घोटाळा : मेहुल चोक्सीला ईडीचा दणका, 151 कोटींची संपत्ती जप्त
मेहुल चोक्सी गीतांजली ज्वैलर्सचा पार्टनर आहे. पीएनबी घोटाळ्यात नीरव मोदीसह चोक्सी देखील आरोपी आहे.
मुंबई : पंजाब नॅशनल बँकेतील तेराशे कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला सक्तवसुली संचालनालय (ईडी)ने चांगलाच दणका दिला आहे. मेहुल चोक्सीच्या गीतांजली ग्रुपच्या कंपनीची 151 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने
ईडीने 'प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट 2002' या कायद्याखाली ही कारवाई केली आहे. मेहुल चोक्सी गीतांजली ज्वैलर्सचा पार्टनर आहे. पीएनबी घोटाळ्यात नीरव मोदीसह चोक्सी देखील आरोपी आहे.
यापूर्वी करण्यात आलेल्या कारवाईत लंडनमधील तुरूंगात असलेला आरोपी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी याच्या 13 आलिशान गाड्यांचा लिलाव करण्यात आला होता. अंमलबजावणी संचलनालयाने मेहुल चोक्सीच्या 2 तर नीरव मोदीच्या 11 गाड्या जप्त केल्या होत्या. याव्यतिरिक्त नीरव मोदीकडे असलेल्या दुर्मिळ छायाचित्रांचाही लिलाव करण्यात आला होता. 22 फेब्रुवारी रोजी ईडीने नीरव मोदीचे 100 कोटींपेक्षा अधिक किंमतीचे शेअर, ठेवी गोठवून आलिशान गाड्या जप्त केल्या होत्या. मेहुल चोक्सी आणि नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेत 13 हजार 570 कोटींचा घोटाळा केला होता.Adjudicating Authority under PMLA confirms ED’s two attachments of properties worth ₹ 151.7 Crore of Mehul Choksi & Geetanjali Group of Companies in #bankfraud case.
— ED (@dir_ed) May 8, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement