एक्स्प्लोर
दहशतवादी बुरहान वाणीच्या कुटुंबीयांना मुफ्ती सरकारकडून 4 लाखांची भरपाई
श्रीनगर : भारतीय सैन्यासोबतच्या चकमकीत ठार झालेला हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वाणीच्या कुटुंबीयांना, जम्मू आणि काश्मीरच्या मेहबूबा मुफ्ती सरकारने चार लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे.
मात्र ही भरपाई बुरहान वाणीच्या मृत्यूसाठी नाही तर त्याचा भाऊ खालिद मुझफ्फर वाणीच्या मृत्यूसाठी दिली जाणार आहे. 13 एप्रिल 2015 रोजी सुरक्षा दलाच्या गोळीबारात बुरहान वाणीचा भाऊ खालिद आणि 16 जणांचा मृत्यू झाला होता. त्रालमधील जंगलात झालेल्या चकमकीत तो ठार झाला होता.
खालिद वानी हिजबूल मुजाहिद्दीनचा दहशतवादी होता आणि तो चकमकीत ठार झाला, असं भारतीय सैन्याचं म्हणणं होतं. मात्र खालिदचा दहशतवाद्यांशी कोणताही संबंधं नव्हता, असा दावा स्थानिकांनी केला होता. 25 वर्षीय खालिदने इंदिरा गांधी विद्यापीठातून पॉलिटिकल सायन्समध्ये मास्टर डिग्री मिळवली होती.
बुरहान वाणीच्या खात्म्यानंतर हिंसाचार
तर 8 जुलै 2016 रोजी काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्याने बुरहान वाणीचा खात्मा केला होता. यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचार उफाळला. या हिंसाचारात सुमारे 86 जणांचा मृत्यू झाला होता.
खालिदच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई!
मात्र खालिद वाणीच्या मृत्यूबद्दल मेहबूबा सरकारने त्याच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. खालिदच्या मृत्यूच्या 20 महिन्यांनी सरकारने या नुकसानभरपाईची घोषणा केली. पण कोणत्याही दहशतवादी किंवा कट्टरतावाद्यांच्या मृत्यूसाठी भरपाई दिली जात नाही. भरपाई देण्याच्या आवश्यक अटींमध्ये एक अट अशी आहे की, मृत व्यक्ती दहशतवादी किंवा उग्रवादी नसावा.
परंतु मेहबूबा सरकारने खालिद वाणीच्या मृत्यूसाठी नुकसानभरपाई देण्याची घोषणा करुन थेट सैन्याच्या भूमिकेचाच विरोध केला आहे.
मुफ्ती सरकारला दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती?
दहशतवाद्यांविरोधात सैन्याने केलेल्या कारवाईत ज्या सामान्य नागरिकांचा मृत्यू होतो, त्यांना जी नुकसानभरपाई दिली जाते, तीच भरपाई आता वाणीच्या कुटुंबीयांना दिली जाणार आहे. बुरहाण वानीसारख्या दहशतवाद्यांबदद्दल मुफ्ती सरकार सहानुभूतीचं धोरण स्वीकारत असल्याची टीका होत आहे. त्यामुळे या निर्णयानंतर काश्मीरसह देशभरात वाद उफाळण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement