एक्स्प्लोर

Pune Mega Defence Expo : पुण्यात 24 फेब्रुवारीपासून 'महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो' चे आयोजन

महाराष्ट्रातील संरक्षण साहित्य उत्पादन करणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने पुण्यात येथे 'महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पोचे' आयोजन  करण्यात आले आहे.

पुणे : संरक्षण उत्पादन क्षेत्रात 'आत्मनिर्भर भारता'च्या (Pune News) वाटचालीला आणखी बळकटी देण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत महाराष्ट्रातील संरक्षण साहित्य उत्पादन करणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (Mega defence expo) क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने 24 ते 26 फेब्रुवारीदरम्यान पुणे येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर येथे 'महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पोचे' आयोजन  करण्यात आले आहे. विशेष म्हणजे संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करणारा महाराष्ट्रातील अशा प्रकारचा हा पहिलाच डिफेन्स एक्स्पो असणार आहे. 

संरक्षण उत्पादन क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्राविण्य असणाऱ्या उद्योगातील समन्वयाला चालना देण्याचे उद्देशाने भारतीय नौसेना, लष्कर आणि वायुसेना या तिन्ही सुरक्षा दलांचा यात महत्वाचा सहभाग असणार आहे. यात 200 हून अधिक सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, स्टार्ट-अप आणि 20 हजारपेक्षा अधिक अभियांत्रिकी विद्यार्थी एकत्र येऊन ज्ञानाची देवाणघेवाण करतील. 

भारताचे औद्योगिक शक्तिस्थान म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र हे आत्मनिर्भर भारताचे संवर्धन करण्यात आघाडीवर असलेले राज्य आहे. राज्यात 39 लाख 88 हजार एमएसएमईचे मजबूत जाळे आहे. ज्यात उद्यम पोर्टलवर 1 कोटी 8 लाख रोजगार आहेत. एमएसएमई डिफेन्स एक्स्पो अशा उद्योगांना त्यांच्या क्षमतांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि संरक्षण उद्योगातील प्रमुख भागधारकांशी जोडण्यासाठी मोठे व्यासपीठ प्रदान करेल.

एमएसएमई डिफेन्स एक्स्पो 2024 ची ठळक वैशिष्ट्ये:

प्रदर्शन: 200 हून अधिक एमएसएमई प्रदर्शक त्यांच्या एरोस्पेस, शस्त्रास्त्रे, इलेक्ट्रॉनिक्स, दळणवळण आणि लॉजिस्टिक्स आदी संरक्षण- संबंधित उत्पादने, तंत्रज्ञान आणि सेवांचे  प्रदर्शन करतील.

• बी 2 बी मीटिंग्ज: एमएसएमई आणि प्रमुख संरक्षण खरेदी संस्था, उद्योग क्षेत्रातील मोठ्या संस्था आणि संभाव्य गुंतवणूकदार यांच्यात संवाद सत्रे होतील.

• नॉलेज सेमिनार :  प्रख्यात तज्ज्ञ आणि  या क्षेत्राशी संबंधित प्रमुख व्यक्ती  'संरक्षण क्षेत्रातील नवे प्रवाह, संधी आणि आव्हाने' यावर दृष्टीक्षेप टाकतील.

 • कौशल्य विकास कार्यशाळा: संरक्षण उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एमएसएमई कर्मचाऱ्यांची कौशल्ये आणि क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने परस्पर संवादाची सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. 

• सरकारी सहाय्य उपक्रम : संरक्षण उत्पादनात एमएसएमईंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध सरकारी योजना, धोरणे आणि आर्थिक साहाय्याचे पर्याय प्रदर्शित करण्यात येतील.

• धोरणात्मक भागीदारी : संरक्षण क्षेत्रात एमएसएमईना व्यवसाय वाढवण्यासाठी संभाव्य खरेदीदार, सहयोगी गुंतवणूकदारांशी संपर्क साधता येईल.

• नव्या प्रवाहाविषयी माहिती: तज्ज्ञांची चर्चासत्रे  आणि कार्यशाळांद्वारे संरक्षण उद्योगातील नवीनतम घडामोडी आणि प्रवाहावर अद्ययावत माहिती मिळू शकेल.

• आर्थिक सहाय्य : संरक्षण क्षेत्रातील एमएसएमईंच्या वाढीला चालना देण्यासाठी सरकारी योजना आणि निधीच्या संधी उपलब्ध होतील.

या एक्स्पोद्वारे  एमएसएमईंना सर्वसमावेशक सहाय्य प्रदान करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यामध्ये उद्योग जोडणी सुलभ करणे, तांत्रिक सहाय्य मिळवून देणे करणे आणि नियामक प्रक्रिया सुव्यवस्थित करणे समाविष्ट आहे. यामुळे भारताच्या संरक्षण परिसंस्थेमध्ये त्यांना सक्रियपणे सहभागी होण्यास सक्षम करता येईल. 'एमएसएमईं डिफेन्स एक्स्पो 2024' मध्ये एमएसएमईं, संरक्षण अधिकारी, उद्योग प्रतिनिधी, गुंतवणूकदार आणि शैक्षणिक क्षेत्रातील 2 हजाराहून अधिक  संस्था सहभागी  होतील अशी माहिती उद्योग विभागाचे प्रधान सचिव, डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली. 

 एल ॲंड टी. डिफेन्स, महिंद्रा, टाटा, डीआरडीओ, सोलार, भारत फोर्ज आणि सरंक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम (पीएसयू) सारख्या उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनी केलेल्या नाविन्यपूर्ण संरक्षण उत्पादनामुळे महाराष्ट्राची संरक्षण क्षेत्रात प्रमुख उत्पादक म्हणून ओळख निर्माण झाली आहे. यात सहभागी संस्थांना  फायदेशीर व्यावसायिक संधी, शेकडो कोटींचे संभाव्य व्यवहार आणि संरक्षण तंत्रज्ञान निर्यात क्षेत्रातील एमएसएमई आणि स्टार्ट-अप्ससाठी धोरणात्मक उपाययोजना यामाध्यमातून शक्य होणार आहेत.

इतर महत्वाची बातमी-

Pune Shiv Jayanti Traffic Diversion : शिवजयंती निमित्त पुण्यात वाहतूक बदल; पाहा कोणते रस्ते सुरु, कोणते बंद?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pune : नव्या लोकप्रतिनिधींकडून पुणेकरांना कोणत्या अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Ganesh Naik On Leopard : बिबट्यांवर नसबंदीच्या प्रयोगाला केंद्राने परवानगी दिली - गणेश नाईक
Shrikant Shinde Lok Sabha : निवडणुका, उद्धव ठाकरे ते काँग्रेस; श्रीकांत शिंदे लोकसभेत कडाडले
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
Embed widget