एक्स्प्लोर

Arvind Kejriwal Statement: एका दिवसासाठी माझ्याकडे CBI-ED सोपवा; अर्धा भाजप तुरुंगात जाईल; केजरीवालांचा हल्लाबोल

Arvind Kejriwal Statement: एका दिवसासाठी माझ्याकडे CBI-ED सोपवा; अर्धा भाजप तुरुंगात जाईल, असं म्हणत अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

Arvind Kejriwal Statement: दिल्लीत एमसीडी निवडणुकांची (Delhi MCD Election) रणधुमाळी सुरु आहे. निवडणुका जिंकण्यासाठी प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं प्रयत्न करत आहे. गेल्या 15 वर्षांपासून एमसीडीमध्ये भाजपची सत्ता आहे आणि ती सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजप सर्वोतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. पण यंदाच्या निवडणुकीत भाजपसमोर आम आदमी पार्टीचं (Aam Admi Party) कडवं आव्हान आहे. दरम्यान, आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या एका वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. केवळ एका दिवसासाठी सीबीआय-ईडी माझ्या ताब्यात द्या, अर्धा भाजप तुरुंगात जाईल, असं म्हणत अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. 

अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचा मोठा आरोप केला आहे. ते म्हणाले की, आम्ही एमसीडीला गेल्या 5 वर्षांत 1 लाख कोटी रुपये दिले, पण या लोकांनी सर्व पैसे खाऊन टाकले. हे लोक भरपूर पैसे खातात. यांनी थोडंतरी काम केलं असतं, तरी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला असता.

भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले

सत्येंद्र जैन यांच्याशी संबंधित प्रश्नावर केजरीवाल म्हणाले की, "एका दिवसासाठी सीबीआय-ईडी माझ्याकडे सोपवा, निम्मे भाजप तुरुंगात जाईल. त्यांच्याकडे तपास यंत्रणा आहेत. आमच्यावर अनेक खटले दाखल झाले, तरीही काहीही सिद्ध होऊ शकलं नाही. हे लोक सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांना भ्रष्ट म्हणतात. मनीषनं दारू घोटाळा केला, 10 कोटी खाल्ल्याचं त्यांचं म्हणणं आहे. इतके छापे टाकूनही काही सापडलं नाही, मग 10 कोटी रुपये गेले कुठे?" 

मोरबी पूल दुर्घटनेवर भाजपनं घातलाय घेराव 

मोरबी पूल दुर्घटनेवरून भाजपला घेरताना केजरीवाल म्हणाले की, "हेच खरे भ्रष्टाचारी आहेत. गुजरातमध्ये त्यांनी घड्याळ बनवणाऱ्या कंपनीला पूल बांधण्याचं कंत्राट दिलं. जगात कुठेही असं काही पाहिलेलं नाही. फक्त एका दिवसासाठी सीबीआय-ईडी आमच्या ताब्यात द्या, अर्धा भाजप तुरुंगात जाईल." 

सत्येंद्र जैन यांच्याबद्दल काय म्हणाले केजरीवाल?

तिहार तुरुंगातून व्हायरल झालेल्या दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांच्या व्हिडीओवर केजरीवाल म्हणाले की, "त्यांना कोर्टात दिलं होतं, पण कोर्टानं कोणताही आदेश दिलेला नाही. म्हणजे त्यांना ज्या सुविधा मिळत आहेत, त्या जेल मॅन्युअलनुसार आहेत. भाजपवर आरोप करताना ते म्हणाले की, "अमित शहा 2010 मध्ये तुरुंगात गेले, तेव्हा त्यांच्यासाठी तिथे डिलक्स जेल बांधण्यात आलं होतं. कारागृहात त्यांचं जेवण बाहेरून यायचं. ते डिलक्स सुविधा घ्यायचे, त्यामुळे प्रत्येकजण घेत असावा असं त्यांना वाटतं."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
Nanded turmeric cooker Blast: आष्टीत हळद शिजवताना कुकरचा भीषण स्फोट, दाबामुळे 600 फूटापर्यंत पार्ट उडाले, 4 शेतकरी जखमी
आष्टीत हळद शिजवताना कुकरचा भीषण स्फोट, दाबामुळे 600 फूटापर्यंत पार्ट उडाले, 4 शेतकरी जखमी
Stock Market Update : शेअर बाजारातील तेजीला सातव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांचे 350000 कोटी बुडाले, घसरणीच्या काळात कोणत्या शेअरमध्ये तेजी?
शेअर बाजारातील तेजीला सातव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांचे 350000 कोटी बुडाले, कारण समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 7PM 25 March 2025Majha Mudda EP 06 : औरंगजेबची कबर ते वाघ्या कुत्रा प्रकरण, महत्वाच्या मुद्द्यांपासून नेते भरकटतायत?Waghya Dog Controversy : रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा, संभाजीराजे छत्रपतींची मागणी, राजेंच्या मागणीनंतर ओबीसी समाज आक्रमकTop 50 Superfast News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 March 2025 : 6 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
Nanded turmeric cooker Blast: आष्टीत हळद शिजवताना कुकरचा भीषण स्फोट, दाबामुळे 600 फूटापर्यंत पार्ट उडाले, 4 शेतकरी जखमी
आष्टीत हळद शिजवताना कुकरचा भीषण स्फोट, दाबामुळे 600 फूटापर्यंत पार्ट उडाले, 4 शेतकरी जखमी
Stock Market Update : शेअर बाजारातील तेजीला सातव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांचे 350000 कोटी बुडाले, घसरणीच्या काळात कोणत्या शेअरमध्ये तेजी?
शेअर बाजारातील तेजीला सातव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांचे 350000 कोटी बुडाले, कारण समोर
अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिले नाहीत, पाया पडू नका; अजित पवारांचा मोलाचा सल्ला
अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिले नाहीत, पाया पडू नका; अजित पवारांचा मोलाचा सल्ला
लग्नापूर्वी शारिरीक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? ऐश्वर्या रायचं उत्तर चर्चेत
लग्नापूर्वी शारिरीक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? ऐश्वर्या रायचं उत्तर चर्चेत
Mumbai : मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
ईद मुबारक... भाजपकडून 32 लाख 'सौगात ए मोदी' किटचे वाटप; रमजाननिमित्त मुस्लिम बांधवांना भेट
ईद मुबारक... भाजपकडून 32 लाख 'सौगात ए मोदी' किटचे वाटप; रमजाननिमित्त मुस्लिम बांधवांना भेट
Embed widget