एक्स्प्लोर

15 January In History: वर्णद्वेषाविरोधी लढणाऱ्या मार्टिन ल्युथर किंग आणि ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्म, भारतीय लष्कर दिन; आज इतिहासात

15 January In History: मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात महत्वाची घटना असलेलं पानिपतचं युद्ध आजच्याच दिवशी संपलं. 

15 January In History: जगासह भारताच्या इतिहासात आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी वर्णद्वेषाविरोधात लढा देणाऱ्या मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांचा जन्म झाला होता. तसेच भारतासाठी पहिले ऑलिम्पिक मेडल आणणाऱ्या खाशाबा जाधव यांचा जन्मही आजच्याच दिवसाचा. 

1761: पानिपतचे तिसरे युद्ध संपले (Third Panipat War) 

भारताच्या इतिहासात निर्णायक व दूरगामी परिणाम करणारे पानिपतचे तिसरे युद्ध आजच्या दिवशी संपले. मराठा साम्राज्यासाठी या युद्धातील अब्दालीकडून झालेला पराभव धक्कादायक होता.  मराठ्यांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. या पराभवाच्या धक्क्यातून पेशवा व त्याचे मराठा राज्य हे कधीच सावरले गेले नाही. मराठा सरदारांची पिढी या लढाईत मारली गेली. पानिपतमधील पराभवामुळे उत्तरेत मराठ्यांच्या तलवारीचा धाकही नष्ट झाला असे म्हटले जाते. 

 1926 : ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्म (Kashaba Jadhav Birth Anniversary)

भारताला ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमधील पहिले पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव यांचा आज जन्मदिवस. खाशाबा जाधव यांनी 1948 मधील लंडन ऑलिम्पिकमध्ये सहावा क्रमांक मिळवला होता. त्यानंतर हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये कांस्यपदक पटकावले होते. भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते. 

1929 : मार्टिन ल्यूथर किंग ज्यूनिअर यांचा जन्म ( Martin Luther King Jr Birthday) 

अमेरिकन नागरी अधिकार चळवळीतील प्रमुख नेते, वर्णद्वेषाविरोधी लढ्यात मोलाचे योगदान आणि नेतृत्व करणारे मार्टिन ल्यूथर किंग यांचा आज जन्मदिवस. मार्टिन ल्यूथर किंग ज्यूनिअर हे धर्मगुरूदेखील होते. अहिंसक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी नागरी अधिकाराची चळवळ उभारली. कृष्णवर्णीयांना मतदान, रोजगार आणि इतर नागरी अधिकारांसाठी त्यांनी मोर्चे काढले. मार्टिन ल्यूथर किंग ज्यूनिअर यांना नोबेल पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले होते. 

1949: भारतीय लष्कर दिन (Indian Army Day)

15 जानेवारी 1949 रोजी जनरल सर फ्रान्सिस बुचर यांनी भारतीय लष्कराचे नियंत्रण फील्ड मार्शल केएम करिअप्पा यांच्याकडे सोपवले. भारताचे अंतिम ब्रिटिश कमांडर फ्रान्सिस बुचर होते. भारतीय लष्कराचे पहिले कमांडर-इन-चीफ फील्ड मार्शल केएम करिअप्पा होते. आजपासून लष्कराचे संपूर्ण नियंत्रण भारताकडे आले. त्यामुळे दरवर्षी 15 जानेवारी रोजी भारतीय लष्कर दिन साजरा केला जातो. 

2002: विठाबाई नारायणगावकर यांचा स्मृतीदिन

तमाशा रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचा स्मृतीदिन. सुंदरता, सुमधुर आवाज, नृत्य या कौशल्याच्या जोरावर त्यांनी रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले. त्यांनी सादर केलेल्या अनेक कलाकृती अजरामर ठरल्या. विठाबाईंना संगीत नाटक अकादमी्चा पुरस्कार मिळाला होता. महाराष्ट्र सरकारने २००६ मध्ये 'तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार' सुरू केला आहे. तमाशा, लोककला क्षेत्रातील कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. 

2014: महाकवी नामदेव ढसाळ यांचा स्मृतीदिन (Namdeo Dhasal Death Anniversary)

दलित साहित्यात परिवर्तन घडवणारे, दलित पँथर चळवळीचे संस्थापक नेते, महाकवी नामदेव ढसाळ यांचा आज स्मृतीदिन. नामदेव ढसाळ यांच्या कविता, लेख हे साहित्य विश्वात महत्त्वाचे समजले जातात. नामदेव ढसाळ यांच्या कवितेची विशिष्ट शैली होती. साहित्य आणि चळवळीत ढसाळ अग्रसेर होते. त्यांनी साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा, वेदनांना वाचा फोडली.

इतर घडामोडी:

1559: राणी एलिझाबेथ (पहिली) यांची इंग्लंडची राणी म्हणून वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे येथे राज्याभिषेक झाला.

1889: द पेंबरटन मेडिसिन कंपनी या कंपनीची अटलांटा, जॉर्जिया, यू. एस. ए. येथे स्थापना झाली. ही कंपनी 'द कोका कोला कंपनी' म्हणून प्रसिद्ध आहे.

1921: महाराष्ट्राचे 9 वे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचा जन्म

1949: जनरल करिअप्पा यांनी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली. 

1956: बहुजन समाज पक्षाच्या नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचा जन्म. 

1996: भारतातील रेल्वे युगाची साक्षीदार आणि  ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) असे करण्यात आले.

2001: सर्वांना मोफत असलेला ज्ञानकोश विकीपिडिया हा इंटरनेटवर प्रथमच उपलब्ध झाला.

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election 2026: नील सोमय्यांच्या वॉर्डात गडबडीचा अंदाज ठाकरेंना आधीच आला; शेवटच्या क्षणी डाव कसा फिरवला, अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सगळंच सांगितलं
नील सोमय्यांच्या वॉर्डात गडबडीचा अंदाज ठाकरेंना आधीच आला; शेवटच्या क्षणी डाव कसा फिरवला, अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सगळंच सांगितलं
Airoli-Katai Naka Freeway: नवी मुंबईवरुन कल्याण - डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?
नवी मुंबईवरुन कल्याण - डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?
Umar Khalid: 'एक वर्ष जामीनासाठी अर्ज करू नका'; उमर खालिद, शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
'एक वर्ष जामीनासाठी अर्ज करू नका'; उमर खालिद, शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
एकनाथ शिंदे, पोलिस असतील, फॉर्म मागे घेण्यासाठी विधानसभेचा अध्यक्ष उभा राहून धमक्या देतोय, आमच्याकडून अजून किती पुरावे हवेत? अविनाश जाधवांचा सवाल
एकनाथ शिंदे, पोलिस असतील, फॉर्म मागे घेण्यासाठी विधानसभेचा अध्यक्ष उभा राहून धमक्या देतोय, आमच्याकडून अजून किती पुरावे हवेत? अविनाश जाधवांचा सवाल

व्हिडीओ

Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी
Meghana Bordikar Parbhani : परभणीत भाजपचाच महापौर होणार! मेघना बोर्डीकरांनी व्यक्त केला विश्वास
Asaduddin Owaisi Amravati Speech: मुलं जन्माला घालण्याच्या विधानावरुन ओवैसींचा राणा,भागवतांवर निशाणा
Parbhani Akola Special Report : समस्या बेसुमार, मतदानावर बहिष्कार;परभणी अकोल्यातील नागरिकांचा निर्णय
Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election 2026: नील सोमय्यांच्या वॉर्डात गडबडीचा अंदाज ठाकरेंना आधीच आला; शेवटच्या क्षणी डाव कसा फिरवला, अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सगळंच सांगितलं
नील सोमय्यांच्या वॉर्डात गडबडीचा अंदाज ठाकरेंना आधीच आला; शेवटच्या क्षणी डाव कसा फिरवला, अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सगळंच सांगितलं
Airoli-Katai Naka Freeway: नवी मुंबईवरुन कल्याण - डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?
नवी मुंबईवरुन कल्याण - डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?
Umar Khalid: 'एक वर्ष जामीनासाठी अर्ज करू नका'; उमर खालिद, शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
'एक वर्ष जामीनासाठी अर्ज करू नका'; उमर खालिद, शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
एकनाथ शिंदे, पोलिस असतील, फॉर्म मागे घेण्यासाठी विधानसभेचा अध्यक्ष उभा राहून धमक्या देतोय, आमच्याकडून अजून किती पुरावे हवेत? अविनाश जाधवांचा सवाल
एकनाथ शिंदे, पोलिस असतील, फॉर्म मागे घेण्यासाठी विधानसभेचा अध्यक्ष उभा राहून धमक्या देतोय, आमच्याकडून अजून किती पुरावे हवेत? अविनाश जाधवांचा सवाल
Shiv Sena Thackeray Group 40 Star Campaigners List: भाजप-शिंदे गटाची अजस्त्र प्रचारयंत्रणा निष्प्रभ करायला उद्धव ठाकरेंनी 40 मोहरे निवडले, आदेश भावोजींवर खास जबाबदारी, स्टार प्रचारकांच्या यादीत कोण-कोण?
भाजप-शिंदे गटाची अजस्त्र प्रचारयंत्रणा निष्प्रभ करायला उद्धव ठाकरेंनी 40 मोहरे निवडले, आदेश भावोजींवर खास जबाबदारी, स्टार प्रचारकांच्या यादीत कोण-कोण?
व्हेनेझुएलाच्या तेल संपत्तीच्या राजरोस लुटीसाठी ट्रम्प यांची पूरती तयारी; राष्ट्राध्यक्षांना बेडरूममधून उचलल्यानंतर आता महिला उपराष्ट्राध्याक्षांनाही जाहीर धमकी!
व्हेनेझुएलाच्या तेल संपत्तीच्या राजरोस लुटीसाठी ट्रम्प यांची पूरती तयारी; राष्ट्राध्यक्षांना बेडरूममधून उचलल्यानंतर आता महिला उपराष्ट्राध्याक्षांनाही जाहीर धमकी!
Avinash Jadhav On Eknath Shinde: उद्धव ठाकरेंचा उमेदवार एकनाथ शिंदेंच्या घरी; मनसेच्या अविनाश जाधवांनी व्हिडीओ दाखवला, ठाण्यात काय घडलं?
उद्धव ठाकरेंचा उमेदवार एकनाथ शिंदेंच्या घरी; अविनाश जाधवांनी व्हिडीओ दाखवला, ठाण्यात काय घडलं?
KDMC Election 2026: कल्याण-डोंबिवलीत भाजपने नव्हे तर ठाकरे गटातील नेत्यानेच सेटिंग केली, आपल्याच उमेदवारांना अर्ज माघारी घ्यायला लावले? नेमकं काय घडलं?
कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंच्या गोटातील 'बिभीषणा'नेच घात केला? सेटिंग करुन आपल्याच उमेदवारांना अर्ज माघारी घ्यायला लावल्याचा आरोप, वरुण सरदेसाईंच्या नावाचाही उल्लेख
Embed widget