(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लिव्ह-इन रिलेशनशिपच्या तुलनेत विवाहित महिला जास्त सुखी, सरसंघचालक मोहन भागवत प्रसिद्ध करणार सर्व्हे
सर्वेक्षणाचा निष्कर्ष मंगळवारी मीडियाशी संवाद साधल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत प्रसिद्ध करणार आहेत. संघाचे प्रचार प्रभारी अरुण कुमार यांनी अशी माहिती दिली.
मुंबई : लिव्ह-इन रिलेशनशिपच्या तुलनेत विवाहित महिला जास्त सुखी असतात, असं एका सर्व्हेतून समोर आलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत एका संघटनेने केलेल्या सर्वेक्षणात हे समोर आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत येत्या मंगळवारी हा अहवाल प्रसिद्ध करणार आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील संस्था 'दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र'ने हे सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणानंतर राजस्थान येथील पुष्कर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत या सर्वेक्षणावर चर्चा देखील झाली. त्यावेळी विवाहित महिलांचा आनंदी राहण्याचं प्रमाण जास्त आहे, तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलांचं आनंदी राहण्याचं प्रमाण तुलनेनं कमी आहे, असं या बैठकीत सांगण्यात आलं.
या सर्वेक्षणाचा निष्कर्ष मंगळवारी मीडियाशी संवाद साधल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत प्रसिद्ध करणार आहेत. संघाचे प्रचार प्रभारी अरुण कुमार यांनी शनिवारी अधिकृत वक्तव्य जारी करुन मोहन भागवत नियमित प्रक्रियेअंतर्गत विदेशी माध्यमांना सामोरे जातील.
विविध क्षेत्रातील लोकांना भेटण्याच्या संघाच्या एका नियमित प्रक्रियेचा भाग आहे. भागवत यावेळी संघ, त्यांच्या कार्यप्रणालीबाबत विदेशी माध्यमांशी चर्चा करतील, असं अरुण कुमार यांनी सांगितलं.
VIDEO | Political News | राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा | बातम्या सुपरफास्ट