एक्स्प्लोर
महाराष्ट्र पोलीस सुविधांच्या बाबतीत आघाडीवर, सर्व्हेतून माहिती उघड
मुंबई : देशातील अनेक पोलीस स्टेशन्समध्ये आजही गाडी, फोन आणि वायरलेससारख्या सुविधा नसल्याचं एका सर्व्हेमधून समोर आलं आहे. ब्यूरो ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंटनं केलेल्या सर्व्हेतून ही माहिती उघड झाली आहे. मात्र महाराष्ट्र या सुविधांमध्ये आघाडीवर असल्याचं स्पष्ट झालं आहे.
देशातील पोलीस स्टेशन्सची स्थिती फारशी चांगली नसतानाच 188 पोलीस स्टेशनमध्ये एकही गाडी नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तसंच 402 पोलीस स्टेशनमध्ये टेलिफोनची सुविधा उपलब्ध नाही. तर 134 पोलीस स्टेशनमध्ये वायरलेस सुविधा उपलब्ध नाही. 65 पोलीस स्टेशन्स अशीही आहेत जिथे ना टेलिफोन आहे ना वायरलेस सुविधा. पण महाराष्ट्रात पोलीस स्टेशन्सची स्थिती समाधानकारक असल्याचं हा सर्व्हे सांगतो.
देशभरातील जवळपास 15,555 पोलीस स्टेशन्समध्ये हा सर्व्हे करण्यात आला. यात ईशान्येकडील राज्यांमध्ये पोलीस स्टेशनमध्ये सुविधांचा अभाव दिसून आला. तर छत्तीसगढसारख्या नक्सल प्रभावित राज्यामध्ये 161 तालुक्यांमध्ये गाड्या नसल्याचं समोर आलं आहे. मध्यप्रदेशमध्ये 111 पोलीस स्टेशन्समध्ये टेलिफोन सेवा उपलब्ध नाही. तसंच मेघालय, मणिपूर आणि उत्तर प्रदेशमध्ये सुविधांचा मोठ्या प्रमाणावर अभाव असल्याचं दिसून आलं आहे.
ब्यूरो ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा रिसर्च सांगतो की प्रति 100 पोलिसांवर 10.13 गाड्या सरासरी देण्यात आल्या आहेत. देशभरात जवळपास 1 लाख 75 गाड्या पोलीसांसाठी देण्यात आल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राकडे सर्वाधिक 17 हजार 131 गाड्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement