एक्स्प्लोर

पुलगाव स्फोटात घातपाताची शक्यता कमी : पर्रिकर

वर्धा/ नवी दिल्ली : पुलगाव स्फोटात घातपाताची शक्यता कमी असल्याचं स्पष्टीकरण संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिलं आहे. देशातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र साठा असलेल्या वर्ध्यातील पुलगावमधील दारुगोळा भांडाराच्या अग्नितांडवात 16 जवान शहीद झाले आहेत. यामध्ये ले. कर्नल आर.एस.पवार आणि मेजर मनोज कुमार यांच्यासह एक लष्कराचा जवान आणि 13 अग्निशमन दलाच्या जवानांचा समावेश आहे.   या स्फोटानंतर घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी मनोहर पर्रिकर वर्ध्यात पोहोचले. यानंतर जखमींची रुग्णालयात जाऊन चौकशी केली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुलगाव स्फोटात घातपाताची शक्यता कमी असल्याचं सांगितलं.   तसंच याप्रकरणी लष्कराला चौकशीचे आदेश दिले असून त्यानंतरच स्फोटाचं नेमकं कारण स्पष्ट होईल, असंही पर्रिकर म्हणाले.   पर्रिकरांनी सांगितलं की, "लष्कराचे दोन अधिकारी, एक जवान आणि अग्निशमन दलाच्या 13 जवानांनी आग पसरु नये म्हणून प्राण अर्पण केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे बाजूला असलेल्या 9 शेड्स वाजल्या. या दुर्घटनेत 16 जण जखमी झाले आहे. त्यापैकी 10 जवानांना उपचार करुन लवकरच डिस्चार्ज दिला जाईल. तर 5 जण आयसीयूमध्ये असून 1 गंभीर जखमी आहे. या शिवाय स्फोटात 130 टन अँटी टँक दारुगोळा भस्म झाला आहे."     पुलगाव स्फोट : 1 लेफ्टनंट, 1 कर्नल, 14 जवान शहीद   देशातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र साठा असलेल्या वर्ध्यातील पुलगावमधील दारुगोळा भांडाराच्या अग्नितांडवात 16 जवान शहीद झाले आहेत. यामध्ये ले. कर्नल आर.एस.पवार आणि मेजर मनोज कुमार यांच्यासह एक लष्कराचा जवान आणि 13 अग्निशमन दलाच्या जवानांचा समावेश आहे.   सोमवारी मध्यरात्री याठिकाणी सुरुवातीला आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिकारी दारुगोळा भांडारमध्ये पोहोचले. मात्र वेअरहाऊसचं दार उघडताच मोठ्ठा स्फोट झाला. या स्फोटात लेफ्टनंट कर्नल आर.एस पवार आणि कर्नल मनोज के. यांचा मृत्यू झाला.   आगीनंतर स्फोटांची मालिका सुरु झाली. या स्फोट आणि अग्नितांडवात 19 हून अधिक जवान जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. धक्कादायक म्हणजे या स्फोटाच्या भीषण आवाजाने 12- 13 जवानांच्या कानाचे पडदे फाटले आहेत. संरक्षणमंत्री जवानांच्या भेटीसाठी रुग्णालयात संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनीही या प्रकरणाची तातडीने दखल घेत, पुलगावला धाव घेतली. त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी जवानांची विचारपूस केली.   दोन गावांचं स्थलांतर या स्फोटामुळे दारुभांडार परिसरातील दोन गाव पूर्णपणे स्थलांतर करण्यात आली आहेत. नागझरी आणि आगरगाव अशी या गावांची नावं आहेत. या स्फोटाची तीव्रता इतकी गंभीर होती की परिसरातील असलेल्या घरांची छतं कोसळली आहेत. अनेकांच्या कानाचे पडदेही फाटले आहेत. काही घरांच्या भिंतीना भेगा पडल्या असून घरांसाठी लावलेले खांब कोसळल्यामुळे अनेकांनी घर सोडलेली आहेत.  या स्फोटानंतर रात्री घटनास्थळी अग्निशमनच्या दोन गाड्या पोहोचल्या होत्या.  मात्र त्या दोन्ही गाड्यांसहित दोन जिप्सी आणि आणखी दोन छोट्या गाड्या स्फोटात खाक झाल्या आहेत.   28 किमीमध्ये दारुगोळा भांडार   दारुगोळा भांडाराचा हा परिसर तब्बल 28 किमीमध्ये पसरला आहे. या स्फोटामुळे केंद्रीय दारुगोळा भांडाराजवळील दोन गावं नागझरी आणि आगरगाव येथील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. पुलगाव दारुगोळा केंद्राचा संपूर्ण भाग हा लष्कराच्या अखत्यारित येतो. त्यामुळे येथे स्फोट कशामुळे घडला याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.   रात्री दीडच्या सुमारास स्फोट : खासदार रामदास तडस   रात्री दीडच्या सुमारास आवाज आला, गच्चीवरुन पाहिल्यावर आगीच्या ज्वाला दिसत होत्या. त्याचवेळी पुलगाव आग असल्याचं समजलं. आम्ही गाड्या काढून तातडीने त्याठिकाणी धाव घेतली. त्यावेळी परिसरातील गावकरी घराबाहेर पडले होते, असं वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनी सांगितलं.   घातपाताची शक्यता नाकारता येत नाही- निवृत्त कर्नल   पुलगाव दारुगोळा भांडारात नेमकी आग कशामुळे लागली, याबाबतची माहिती चौकशीनंतर समोर येईल, मात्र पठाणकोटप्रमाणे इथेही घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, अशी शंका निवृत कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केली.   आशियातील दुसऱ्या क्रमाकांचं शस्त्रास्त्र भंडार   पुलगाव दारुगोळा भांडार हे भारतीय लष्कराच्या सर्वात मोठ्या दारुगोळा भांडारापैकी एक आहे. तर आशियातील दुसऱ्या क्रमांकाचं दारुगोळा भंडार आहे.   इथे दारुगोळा बनवण्यासोबतच मोठा शस्त्रसाठाही आहे. त्यामुळे हा परिसर संवेदनशील आहे. पुलगाव दारुगोळा भांडाराचा संपूर्ण परिसरत सुमारे 28 किलोमीटरचा आहे. या परिसरात लष्कराच्या जवानांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नाही.   इथे शस्त्रास्त्रांचा साठा असल्यामुळे साहजिकच मोठ्या सुरक्षा व्यवस्थेचं कवच असतं. शस्त्रास्त्रांचे अनेक बंकर बनवलेले असतात. प्रत्येक बंकरमध्ये सुमारे 5 ते 6 हजार किलो शस्त्रास्त्रांचा साठा असतो.   मात्र आज जी आग लागली ती नेमकी कोणत्या बंकरला लागली आणि त्या बंकरच्या सुरक्षेसाठी किती जवान होते, हे अद्याप समजू शकलेलं नाही.   संबंधित बातम्या

पुलगाव स्फोट : 1 लेफ्टनंट, 1कर्नल, 14 जवान शहीद

पुलगाव स्फोट : 16 जवान शहीद, अनेकांच्या कानाचे पडदे फाटले

लष्कराच्या पुलगाव दारुगोळा भांडारात स्फोटांची मालिका

पुलगाव स्फोट : अपघात की घातपात?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार

व्हिडीओ

KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report
Ganesh Naik On Eknath Shinde : गणेश नाईकांनी केला टांगा पलटी, आता वादाला कलटी Special Report
Navneet Rana Amravati : मी भाजपसाठी काम करते, ठाकरेंची दुकान आता बंद, नवनीत राणांचा घणाघात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Embed widget