एक्स्प्लोर

Mann ki Baat : आज पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'चा 80वा भाग; देशवासियांशी साधणार संवाद

Mann ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आज 'मन की बात'चा 80वा भाग प्रसारित होणार आहे.

Mann ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता मन की बातमधून देशवासियांना संबोधित करणार आहेत. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता आकाशवाणी आणि डीडी चॅनलवर प्रसारित केल्या जाणाऱ्या 'मन की बात' या कार्यक्रमाचा आजचा 80वा भाग आहे. 

प्रसार भारती आपल्या आकाशवाणी नेटवर्कवर हा कार्यक्रम 23 भाषांमध्ये प्रसारित करते. याव्यतिरिक्त प्रसार भारती आपल्या विविध डीडी चॅनल्सवर या कार्यक्रमाच्या व्हिज्युअल आवृत्त्या हिंदी आणि इतर भाषांमध्येही प्रसारित केल्या जातात.

79व्या मन की बातच्या भागात पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान मोदींनी 79व्या मन की बातच्या भागाच्या सुरुवात टोकियो ऑलिम्पिकवरील चर्चेसोबत केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना तिरंगा घेऊन चालताना पाहून केवळ मीच नाहीतर संपूर्ण देश रोमांचित झाला. दोन दिवसांपूर्वीचे काही अद्भुत फोटो, काही आठवणी आता माझ्या डोळ्यांसमोर आहेत. त्यामुळे यंदा मी मन की बातची सुरुवात याच काही क्षणांनी करत आहे. 

त्यासोबतच पंतप्रधान मोदींनी 79व्या 'मन की बात' कार्यक्रमाच्या ओडिशातील मजूर इसाक मुंडा जे सध्या युट्यूबर आहेत, त्यांचं कौतुक केलं होतं. मुंडा (35) ओडिशाच्या संबलपूर जिल्ह्यातील जुजुमुरा ब्लॉकच्या अंतर्गत बाबूपाली गावातील मजूर. आपल्या भूकेपासून लक्ष विचलित करण्यासाठी युट्यूब पाहणारा हा मजूर सध्या युट्यूब स्टार आहे. एककेळी पोटाची अबाळ होणारा हा मजूर युट्यूबच्या माध्यमातून लाखो रुपये कमावत आहे. 

2014 पासून सतत करत आहेत 'मन की बात'

पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात केली होती. ऑक्टोबर 2014 मध्ये मोदींनी मन की बातची सुरुवात केली होती. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवार मन की बातद्वारे संवाद साधत असतात. आज 80 वी मन की बात आहे. या कार्यक्रमाचं पहिलं प्रसारण 3 ऑक्टोबर 2014 साली झालं होतं. त्यानंतर प्रत्येक महिन्याला पंतप्रधान या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांसोबत अनेक मुद्द्यावर चर्चा करतात. 27 डिसेंबर रोजी प्रसारित होणारा 'मन की बात' हा कार्यक्रम या वर्षीचा शेवटचा कार्यक्रम असेल.

महत्त्वाच्या बातम्या

'स्वतःचा पक्षच हिला गांभीर्यानं घेत नाही...';'जेन झीं'ना 'जनरेशन गटार' म्हणणाऱ्या कंगनावर कॉकरोच जनता पार्टीचे तिखट वार
'स्वतःचा पक्षच हिला गांभीर्यानं घेत नाही...';'जेन झीं'ना 'जनरेशन गटार' म्हणणाऱ्या कंगनावर कॉकरोच जनता पार्टीचे तिखट वार
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
E 20 Ethanol Nitin Gadkari: दिल्लीत आता इथेनॉलवरुन वातावरण पेटणार, E 20 पेट्रोलविरोधात वाहनचालकांचा 4 ऑगस्टला संसदेवर मोर्चा
दिल्लीत आता इथेनॉलवरुन वातावरण पेटणार, E 20 पेट्रोलविरोधात वाहनचालकांचा 4 ऑगस्टला संसदेवर मोर्चा
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: नीट पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश
NEET पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश
E 20 Ethanol Nitin Gadkari: दिल्लीत आता इथेनॉलवरुन वातावरण पेटणार, E 20 पेट्रोलविरोधात वाहनचालकांचा 4 ऑगस्टला संसदेवर मोर्चा
दिल्लीत आता इथेनॉलवरुन वातावरण पेटणार, E 20 पेट्रोलविरोधात वाहनचालकांचा 4 ऑगस्टला संसदेवर मोर्चा
Rajapur Anuskura ghat Land Slide: राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
Embed widget