Mann Ki Baat 100th Episode LIVE: पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमाची शंभरी; देशभरात भाजपकडून विशेष कार्यक्रमाची तयारी
Mann Ki Baat 100th episode LIVE Updates: पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'ची आज शंभरी, मुंबईत अनेक कार्यक्रम, गृहमंत्री अमित शाह मुंबईतल्या कार्यक्रमाला लावणार हजेरी
LIVE
Background
Mann Ki Baat 100th episode LIVE Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2014 पासून सातत्यानं 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे दर महिन्याच्या अंतिम रविवारी जनतेशी संवाद साधतात. आज मन की बात शंभरीत पदार्पण करीत आहे. त्यामुळे त्याची जय्यत तयारी सुरू आहे. देशवासियांशी थेट संवाद साधावा, त्यांच्या कल्पना, समस्या आणि मतं ऐकणं या उद्देशानं मोदींनी `मन की बात` हा कार्यक्रम सुरु केला होता. आज या मन की बातची शंभरी पूर्ण होतेय. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून देशभरात या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी सुरु आहे. मुंबईसह उपनगरातल्या 5 हजारांहून अधिक ठिकाणी 'मन की बात' कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण ऐकण्यासाठी व्यवस्था करण्यात आलीये.
लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर विशेष जबाबदारी
'मन की बात'चा 100 वा भाग संस्मरणीय करण्यासाठी भाजप आणि सरकारने रोडमॅप तयार केला आहे. तो यशस्वी करण्यासाठी पक्षाच्या वतीने सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मन की बातचे प्रसारण ऐकण्यासाठी भाजपच्या सर्व खासदार आणि आमदारांनी विशेष व्यवस्था केली आहे. या अंतर्गत जास्तीत जास्त लोकांचा समावेश करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. सर्वसामान्यांपासून ते जाणकारांपर्यंत सर्वांची उपस्थिती असावी, अशी सूचना देण्यात आली आहे.
भारतातील राजभवनांमध्ये होणार थेट प्रक्षेपण
पंतप्रधान मोदींच्या मन की बातच्या शंभराव्या भागाचं देशातील राजभवनांमध्येही थेट प्रक्षेपण होणार आहे. मुंबईत राजभवनात होणाऱ्या 100 व्या भागाच्या प्रक्षेपण कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस आणि 'मन की बात' मध्ये उल्लेख झालेल्या व्यक्ती उपस्थित राहणार आहे. यामध्ये पद्म पुरस्कार विजेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योग समुदाय आणि चित्रपट उद्योगातील नामवंतांचा समावेश आहे. तर केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पीयूष गोयल मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणांहून 'मन की बात'चं थेट प्रक्षेपण पाहणार आहेत. 'मन की बात'च्या 100 व्या भागाचा सोहळा साजरा करण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया आणि देशभरातील विशेष महत्त्वाच्या 12 स्मारकस्थळांवर सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडून मोठ्या पडद्यांवर प्रक्षेपण केलं जाणार आहे.
शंभराव्या 'मन की बात'निमित्त मुंबईत विविध कार्यक्रमांचं आयोजन
गृहमंत्री अमित शहा रविवारी मुंबईतील विलेपार्ले येथे 'मन की बात' निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तर पियुष गोयल कांदिवलीत होणाऱ्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. भारतीय जनता पक्ष (BJP) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या रेडिओ प्रसारणाचा शंभरावा भाग 'अभूतपूर्व' जनसंपर्क कार्यक्रम बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पीएम मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी त्यांच्या मासिक प्रसारणादरम्यान अनेक मुद्द्यांवर बोलतात. हा कार्यक्रम 2014 मध्ये सुरू झाला होता.
Mann Ki Baat: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत... : पंतप्रधान मोदी
Mann Ki Baat: पीएम मोदी म्हणाले, 'मन की बात'शी संबंधित विषय जनआंदोलन बनला आणि तुम्ही लोकांनी त्याला जनआंदोलन बनवलं. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत मी 'मन की बात' शेअर केली. तेव्हा जगभरात त्याची चर्चा झाली. 'मन की बात' माझ्यासाठी इतरांच्या गुणांची पूजा करण्यासारखं आहे.
Live: लंडनमध्ये मन की बातचं लाईव्ह प्रसारण
PM Modi Mann Ki Baat Live: लंडनमध्ये मन की बातचं लाईव्ह प्रसारण सुरू आहे.
#WATCH | Union Minister Jitendra Singh listens to the 100th episode of #MannKiBaat at India House in London, UK. pic.twitter.com/yOpYXHNSjQ
— ANI (@ANI) April 30, 2023
PM Modi Mann Ki Baat: प्रत्येक वयोगटातील लोक 'मन की बात' कार्यक्रमाशी जोडले गेले : पंतप्रधान मोदी
PM Modi Mann Ki Baat: 'मन की बात'च्या शंभराव्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'मन की बात' हे कोट्यवधी भारतीयांचं मन आहे. ती त्यांच्या भावनांची अभिव्यक्ती आहे. 3 ऑक्टोबर 2014 रोजी आम्ही 'मन की बात'चा प्रवास सुरू केला. मन की बातमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक सामील झाले. सर्व व योगटातील लोक सामील झाले.
PM Modi Mann Ki Baat: सेल्फी विथ डॉक्टर ही मोहीम मोठी ठरली : पीएम मोदी
PM Modi Mann Ki Baat: सेल्फी विथ डॉटर मोहिमेचा संदर्भ देत पीएम मोदी म्हणाले की, देशापासून परदेशात ही मोहीम खूप चालली आहे. हा सेल्फीचा मुद्दा नव्हता, तो मुलींशी संबंधित होता ज्यात लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
Mann Ki Baat: रेकॉर्डिंग दरम्यान मी खूप वेळा भावूक झालो : पंतप्रधान मोदी
Mann Ki Baat: पीएम मोदी म्हणाले, या कार्यक्रमात मी अनेकवेळा इतका भावूक झालो. त्यामुळे एपिसोड पुन्हा रेकॉर्ड करावा लागला. हा प्रवास माझ्यासाठी खूप खास आणि महत्त्वाचा आहे.