एक्स्प्लोर

मोदी 'नीच', मणिशंकर अय्यर यांची जीभ घसरली, टीकेनंतर माफीनामा

मोदींना उद्देशून 'नीच' असा शब्द मणिशंकर अय्यर यांनी वापरला. मोदींनीही अय्यर यांना प्रत्युत्तर दिले असून, राहुल गांधींनीही अय्यर यांच्या विधानाचा निषेध व्यक्त करत माफीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : 'चहावाला पंतप्रधान बनू शकत नाही' असे म्हणत राजकीय वाद निर्माण करणाऱ्या काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत अपशब्द वापरले आहेत. मोदींना उद्देशून 'नीच' असा शब्द मणिशंकर अय्यर यांनी वापरला. मोदींनी अय्यर यांना प्रत्युत्तर दिले असून, राहुल गांधींनीही अय्यर यांच्या विधानाचा निषेध व्यक्त करत माफीची अपेक्षा व्यक्त केली आहे. मणिशंकर अय्यर नेमकं काय म्हणाले? "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी एका व्यक्तीचं मोठं योगदान होतं, त्यांचं नाव म्हणजे जवाहरलाल नेहरु आणि अशा कुटुंबाबद्दल घाणेरडे वक्तव्य केली जातात, तेही डॉ. आंबेडकरांच्या नावाने मोठ्या वास्तूच्या उद्घटनावेळीच. मला वाटतं ही (नरेंद्र मोदी) व्यक्ती अत्यंत नीच प्रकारची आहे. तिच्यात कोणतीही सभ्यता नाही. अशा चांगल्या प्रसंगी घाणेरड्या राजकारणाची काय गरज आहे?", असे मणिशंकर अय्यर म्हणाले. पंतप्रधान मोदींचं प्रत्युत्तर सुरतमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली. अय्यर यांनी आपल्याला उद्देशून वापरलेले शब्द म्हणजे गुजरातचा अपमान असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. "उच्च-नीच हे देशाचे संस्कार नाहीत. माझ्यासारख्याने चांगले कपडे परिधान केल्याचे मुघल संस्कार असणाऱ्यांना बघवत नाहीत. मी भलेही खालच्या जातीतला असेन, मात्र काम उच्च आहेत.", असे मोदी म्हणाले. "गुजरात निवडणुकीतील पराभव समोर दिसत असल्याने काँग्रेसच्या नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. मला भलेही त्यांनी नीच म्हटलं असेल, पण कुणीही त्यांच्याविरोधात मर्यादांचं उल्लंघन करु नका. गुजरात आणि भाजपचे असे संस्कार नाहीत. मणिकशंकर यांचे शब्द त्यांनाच लख लाभो. 9 आणि 14 डिसेंबर रोजी कमळाला मत देऊन 'नीच'चं उत्तर द्या.", असेही मोदी यांनी आवाहन केले. राहुल गांधी काय म्हणाले? भाजप आणि पंतप्रधान मोदी कायमच काँग्रेसविरोधात घाणेरडी भाषा वापरत असतात. मात्र, काँग्रेसचे संस्कार आणि वारसा वेगळा आहे. त्यामुळे मणिशंकर अय्यर यांनी मोदींना उद्देशून वापरलेल्या शब्दाचं मी समर्थन करणार नाही. किंबहुना, काँग्रेस पक्ष आणि मी अशी अपेक्षा करतो की, त्यांनी मोदींबाबत वापरलेल्या शब्दाबद्दल माफी मागावी.", असे म्हणत राहुल गांधींनी मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. टीकेनंतर मणिशंकर अय्यर यांचा माफीनामा सर्वच स्तरातून झालेल्या टीकेनंतर मणिशंकर अय्यर यांनी माफी मागितली आहे. "मी इंग्रजीतील 'Low' शब्दाचा अनुवाद 'नीच' असा केला होता. हिंदी ही माझी मातृभाषा नाही. तरीही चुकीचा अर्थ निघाला असेल, तर दिलगिरी व्यक्त करतो.", असे म्हणत मणिशंकर अय्यर यांनी माफी मागितली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: भोंदू अशोक खरात SIT चौकशीची मोठी अपडेट; मोबाईल मधला डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू
Maharashtra Live Blog Updates: भोंदू अशोक खरात SIT चौकशीची मोठी अपडेट; मोबाईल मधला डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू
Sanjay Raut: आदित्य ठाकरेंची मोहित कंबोजांच्या लेकीच्या वाढदिनाला हजेरी, मग आता एकनाथ शिंदेंच्या सुद्धा कार्यक्रमाला जाणार का? संजय राऊत काय काय म्हणाले??
आदित्य ठाकरेंची मोहित कंबोजांच्या लेकीच्या वाढदिनाला हजेरी, मग आता एकनाथ शिंदेंच्या सुद्धा कार्यक्रमाला जाणार का? संजय राऊत काय काय म्हणाले??
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती, पुढील आठवड्यात सहा दिवस बँका राहणार बंद, पगार कधी होणार?
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती, पुढील आठवड्यात सहा दिवस बँका राहणार बंद, पगार कधी होणार?
भारताने शेजारधर्म पाळला! संकटात असलेल्या श्रीलंकेला मोठी मदत, 38 हजार मेट्रिक टन इंधनाचा पुरवठा
भारताने शेजारधर्म पाळला! संकटात असलेल्या श्रीलंकेला मोठी मदत, 38 हजार मेट्रिक टन इंधनाचा पुरवठा

व्हिडीओ

Prashant Padole Accident : गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळेंच्या वाहनाचा अपघात, पडोळे किरकोळ जखमी
Satara ZP Rada : सातारा झेडपी राडा प्रकरण भोवलं, चौकशी होईपर्यंत SP Tushar Doshi सक्तीच्या रजेवर
Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
Ashok Kharat Police Custody | अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cameron Green: तब्बल 25.20 कोटी मोजून केकेआरनं धुरंदर संघात आणला, पण बॉलिंगची संधी दिलीच नाही! कॅप्टन अजिंक्य रहाणेच्या उत्तरानं सुद्धा डोकं खाजवायची वेळ आली...
तब्बल 25.20 कोटी मोजून केकेआरनं धुरंदर संघात आणला, पण बॉलिंगची संधी दिलीच नाही! कॅप्टन अजिंक्य रहाणेच्या उत्तरानं सुद्धा डोकं खाजवायची वेळ आली...
Sanjay Raut: आदित्य ठाकरेंची मोहित कंबोजांच्या लेकीच्या वाढदिनाला हजेरी, मग आता एकनाथ शिंदेंच्या सुद्धा कार्यक्रमाला जाणार का? संजय राऊत काय काय म्हणाले??
आदित्य ठाकरेंची मोहित कंबोजांच्या लेकीच्या वाढदिनाला हजेरी, मग आता एकनाथ शिंदेंच्या सुद्धा कार्यक्रमाला जाणार का? संजय राऊत काय काय म्हणाले??
Ashok Kharat Case: मोठी बातमी : नीलम गोऱ्हेही अशोक खरातच्या भक्त, नाशिकच्या 5 स्टार हॉटेलमध्ये भेट, तृप्ती देसाईंच्या दाव्याने खळबळ
नीलम गोऱ्हेही अशोक खरातच्या भक्त, नाशिकच्या 5 स्टार हॉटेलमध्ये भेट, तृप्ती देसाईंच्या दाव्याने खळबळ
Ashok Kharat and Vijay Waddttiwar: अशोक खरात बड्या सरकारी अधिकाऱ्यांना एकमेकांच्या बायकांशी लैंगिक संबंध ठेवायला सांगायचा, विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा
मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या बायकांचे स्वॅपिंग, लैंगिक संबंध ठेवण्याच्या सूचना, अशोक खरातबद्दल वडेट्टीवारांचा स्फोटक दावा
Devendra Fadnavis On Rupali Chakankar Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना समन्स; देवेंद्र फडणवीसांना विचारताच एका वाक्यात विषय संपवून टाकला!
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना समन्स; फडणवीसांना विचारताच एका वाक्यात विषय संपवून टाकला!
Satara Chemical Factory Blast : तासवडे एमआयडीसीतील केमिकल फॅक्ट्रीत भीषण स्फोट; काचा फुटल्या, दहा किलोमीटरचा परिसर स्फोटानं हादरला, नेमकं काय घडलं?
साताऱ्याच्या तासवडे एमआयडीसीतील केमिकल फॅक्ट्रीत भीषण स्फोट; काचा फुटल्या, दहा किलोमीटरचा परिसर स्फोटानं हादरला, नेमकं काय घडलं?
'धुरंधर'मधल्या रहमान डकैतनंतर अक्षय खन्ना नव्या दमदार भूमिकेत, BTS फोटोनं घातलाय धुमाकूळ, तुम्ही पाहिलात?
'धुरंधर'मधल्या रहमान डकैतनंतर अक्षय खन्ना नव्या दमदार भूमिकेत, BTS फोटोनं घातलाय धुमाकूळ, तुम्ही पाहिलात?
Sindhudurg Crime News : 'आमच्या जमिनीत काय करताय?' विचारलं अन् थेट कोयत्याने घाव घातला, जमिनीच्या वादातून 65 वर्षीय महिलेला संपवलं; सिंधुदुर्ग हादरलं
'आमच्या जमिनीत काय करताय?' विचारलं अन् थेट कोयत्याने घाव घातला, जमिनीच्या वादातून 65 वर्षीय महिलेला संपवलं; सिंधुदुर्ग हादरलं
Embed widget