एक्स्प्लोर

Devendra Fadnavis On Rupali Chakankar Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना समन्स; देवेंद्र फडणवीसांना विचारताच एका वाक्यात विषय संपवून टाकला!

Devendra Fadnavis On Rupali Chakankar Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांच्यासह शिवनिका संस्थानच्या आजी-माजी ट्रस्टींना समन्स बजावण्यात आलं असून आज चौकशीची शक्यता वर्तवली जात आहे.

Devendra Fadnavis On Rupali Chakankar Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्यासोबतची ओळख रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना चांगलीच भोवली आहे. सर्वात आधी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा आणि मग पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा चाकणकरांना द्यावा लागला. पण हे प्रकरण इतक्यावर संपलं नसून रुपाली चाकणकारांच्या पाठीमागे आता चौकशीचाही ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)

रुपाली चाकणकर यांच्यासह शिवनिका संस्थानच्या आजी-माजी ट्रस्टींना समन्स बजावण्यात आलं असून आज चौकशीची शक्यता वर्तवली जात आहे. याचदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रुपाली चाकणकरांना बजावण्यात आलेल्या समन्सबाबत विचारले असता त्यांची सूचक भाष्य केलं. (Devendra Fadnavis On Rupali Chakankar)

योग्यवेळी सर्वांना नेमकी माहिती देण्यात येईल- देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On Rupali Chakankar)

अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांना देण्यात आलेल्या समन्सबाबत माझ्याकडे माहिती नाही. जी काही चौकशी सुरू आहे, ती निष्पक्षपणे सुरू आहे. दररोज अशा प्रकरणांची माहिती दिली जात नाही. आवश्यकता असल्यासच आम्ही माहिती घेतो. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरू असून, योग्यवेळी त्याबाबतची माहिती दिली जाईल, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

रुपाली चाकणकरांची आज चौकशी होण्याची शक्यता- (Ashok Kharat Case Nashik Crime News)

अशोक खरातच्या अघोरी कृत्यांचा आणि आर्थिक व्यवहारांचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने आता त्यांचा मोर्चा खरातशी संबंधित संस्थांकडे वळवला आहे. खरातच्या 'शिवनिका' संस्थेचे सर्व व्यवहार आता एसआयटीच्या रडारवर आले आहे. त्याच्या चौकशीसाठी रुपाली चाकणकर यांनाही समन्स बजावल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीये. त्यामुळे रुपाली चाकणकारांच्या पाठीमागे आता चौकशीचाही सासेमिरा लागण्याची शक्यता आहे. रुपाली चाकणकर यांच्यासह शिवनिका संस्थानच्या आजीमाजी ट्रस्टींना समन्स बजावण्यात आलं असून आज चौकशीची शक्यता वर्तवली जात आहे. 

अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी- (Ashok kharat Case)

स्वयंघोषित कॅप्टन भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. आता 1 एप्रिलपर्यंत खरात पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे. महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या या गंभीर प्रकरणात पोलीस तपासात अद्याप अनेक गोष्टी स्पष्ट व्हायच्या आहेत. तपासाची व्याप्ती मोठी असून नवनवीन पीडित महिला समोर येत असल्याने, या वाढीव कोठडीत अशोक खरातच्या गुन्हेगारी साम्राज्याचे आणखी कोणते धागेदोरे हाती लागतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

संबंधित बातमी:

Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
Nagpur Crime: गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
Antilia Bomb Scare Case : अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सचिन वाझे, प्रदीप शर्मांसह 10 आरोपींवर अखेर आरोप निश्चित
अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सचिन वाझे, प्रदीप शर्मांसह 10 आरोपींवर अखेर आरोप निश्चित

व्हिडीओ

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
Yavatmal Rain Farmar: मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
Embed widget