Manish Sisodia Arrested: मनीष सिसोदिया यांना अटक, जवळपास 8 तासांच्या चौकशीनंतर सीबीआयची कारवाई
Manish Sisodia Arrested: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दारू घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
Manish Sisodia Arrested: दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया अटक केली आहे. तत्पूर्वी मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने त्यांची चौकशी केली. या चौकशीसाठी ते सकाळी 11.10 वाजता दिल्लीतील सीबीआयच्या मुख्य कार्यलयात पोहोचले होते. चौकशीला सामोरे जाण्याआधी ते आप पक्षाचे नेते संजय सिंह आणि सौरभ भारद्वाज यांच्यासह राजघाटावर पूजा करण्यासाठी गेले होते.
Delhi | CBI arrests Delhi Deputy CM Manish Sisodia in connection with liquor policy case. pic.twitter.com/gFjHPV33ZG
— ANI (@ANI) February 26, 2023
Manish Sisodia Arrested: अटकेपूर्वी केलं होत ट्वीट
अटक होण्याआधी सिसोदिया यांनी ट्वीट करत म्हटलं होत की, ''आज पुन्हा सीबीआय मुख्यालयात जात आहे, मी तपासात पूर्ण सहकार्य करेन. लाखो मुलांचे प्रेम आणि करोडो देशवासीयांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत.'' त्याच ट्विटमध्ये ते म्हणाले की, ''मला काही महिने तुरुंगात राहावे लागले तरी मला पर्वा नाही. देशासाठी ज्या भगत सिंहांना फाशी देण्यात आली त्यांचा मी अनुयायी आहे. अशा खोट्या आरोपांमुळे तुरुंगात जाणे ही छोटी गोष्ट आहे.''
आज फिर CBI जा रहा हूँ, सारी जाँच में पूरा सहयोग करूँगा. लाखों बच्चो का प्यार व करोड़ो देशवासियो का आशीर्वाद साथ है
— Manish Sisodia (@msisodia) February 26, 2023
कुछ महीने जेल में भी रहना पड़े तो परवाह नहीं. भगत सिंह के अनुयायी हैं, देश के लिए भगत सिंह फाँसी पर चढ़ गए थे. ऐसे झूठे आरोपों की वजह से जेल जाना तो छोटी सी चीज़ है
Manish Sisodia Arrested: केजरीवाल यांनीही केलं होत ट्वीट
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ट्वीट म्हटलं होत की, ते तुरुंगातून त्यांच्या सुटकेची आतुरतेने वाट पाहत आहोत. केजरीवाल यांनी ट्विटमध्ये लिहिले होते की, देव तुमच्यासोबत आहे, लाखो मुलांच्या प्रार्थना आणि त्यांचे पालक तुमच्यासोबत आहेत, जेव्हा तुम्ही देश आणि समाजासाठी तुरुंगात जाता, तेव्हा तुरुंगात जाणे हा शाप नसून आशीर्वाद आहे. तुम्ही लवकरच तुरुंगातून परत बाहेर यावे, अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो. दिल्लीची मुले तुमची वाट पाहतील.
भगवान आपके साथ है मनीष। लाखों बच्चों और उनके पेरेंट्स की दुआयें आपके साथ हैं। जब आप देश और समाज के लिए जेल जाते हैं तो जेल जाना दूषण नहीं, भूषण होता है। प्रभू से कामना करता हूँ कि आप जल्द जेल से लौटें। दिल्ली के बच्चे, पैरेंट्स और हम सब आपका इंतज़ार करेंगे। https://t.co/h8VrIIYRTz
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 26, 2023