एक्स्प्लोर
मणिपूरमध्ये अतिरेकी हल्ला, आसाम रायफल्सचे 6 जवान शहीद
मणिपूर : मणिपूरमधील चंदेल जिल्ह्यात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात सहा जवान शहीद झाले आहेत. हे सर्व जवान '29 आसाम रायफल्सचे' असून यामध्ये एका कनिष्ठ अधिकाऱ्याचा समावेश आहे.
चंदेल जिल्ह्यातल्या एका गावात झालेल्या भूस्खलनाचा आढावा घेण्याचं काम करुन जवान परतत होते. त्यावेळी दबा धरुन बसलेल्या या अतिरेक्यांनी अचानक हल्ला चढवला. यावेळी भारत-म्यानमार सीमेजवळ जवान आणि अतिरेक्यांमध्ये झालेल्या चकमकीत आसाम रायफल्सच्या जवानांना वीरमरण आलं.
पाच जवान आणि ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर (जेसीओ) या हल्ल्यात शहीद झाले. गेल्या वर्षीही याच परिसरात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात 18 जवान हुतात्मा झाले होते.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केलं. कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
https://twitter.com/BJPRajnathSingh/status/734366748716105729
https://twitter.com/BJPRajnathSingh/status/734369067621048320
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement