एक्स्प्लोर
IPL च्या सट्ट्यात द्रौपदीप्रमाणे पत्नी पणाला, पोलिसात तक्रार
कानपूर : महाभारतात द्यूत या खेळात द्रौपदीला पणावर लावल्यानंतर त्यात हरलेल्या पांडवांची कथा सर्वज्ञात आहे. मात्र आजच्या काळातही आयपीएलवर सट्टेबाजी करणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका तरुणाने अशाचप्रकारे बायकोला गमावल्याचं समोर आलं आहे.
उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातील गोविंदनगरमध्ये हा प्रकार घडल्याचं उघडकीस झालं आहे. रविंद्र सिंग या तरुणाने पत्नी जसमीत कौरला आयपीएलच्या सट्ट्यात पणाला लावलं. मात्र त्यात पराभव झाल्यानंतर इतर सट्टेबाजांनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली. हा त्रास वाढल्यावर जसमीतने पोलिसांत धाव घेतली, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी तक्रार दाखल केली असून आरोपींची संख्या मोठी असल्याची माहिती आहे. शेअर मार्केटमध्ये सर्व पैसे गमावल्यानंतर रविंद्रने आपल्या पत्नीलाच पणाला लावलं होतं. मात्र सट्टा हरल्याने तो पत्नीलाही गमावून बसला. रविंद्रच्या लग्नाला पाच वर्ष झाली आहेत, मात्र त्याचं सट्टेबाजीचं व्यसन लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच समोर आल्याचं त्याची पत्नी सांगते.
रविंद्रने लग्नानंतर काहीच दिवसांत तिच्याकडे दागिने आणि पैशांची मागणी केली. हळूहळू तिला आपल्या पतीच्या सट्टेबाजीच्या आणि दारुच्या व्यसनाबद्दल समजलं. आयपीएल सट्टेबाजीच्या वेळी त्याने घरदार विकण्याचाही घाट घातल्याचं जसमीत सांगते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement