एक्स्प्लोर
बंदुकीसोबत सेल्फी महागात, गोळी डोक्यातून आरपार
विजयचे नातेवाईक मात्र शेजराच्या छोटू नामक तरुणावर हत्येचा आरोप करत आहेत.
नवी दिल्ली : सेल्फीचे भयंकर रुप दिल्लीत समोर आले आहे. दिल्लीतील विजय विहार परिसरात बंदुकीसोबत सेल्फी घेताना एकाचा मृत्यू झाला. काल रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली.
विजय नामक व्यक्ती राजस्थानहून दिल्लीत आपल्या काकांच्या येथे कामानिमित्त राहण्यास आला होता. काकांच्या घरात परवाना असलेली बंदूक होती. या बंदुकीसोबत विजय सेल्फी घेत असताना, अचानक गोळी सुटली आणि विजयच्या डोक्याच्या आरपार गेली. या घटनेत विजयचा मृत्यू झाला. या घटनेवेळी छोटू नामक आणखी एक व्यक्ती त्याच्या सोबत होती.
विजयचे नातेवाईक मात्र शेजराच्या छोटू नामक तरुणावर हत्येचा आरोप करत आहेत. सोबत सेल्फी घेताना शेजारील छोटू नामक तरुणही उपस्थित होता. त्यामुळे छोटूने विजयची हत्या केल्याचा आरोप विजयचे नातेवाईक करत आहेत.
दरम्यान, विजयच्या मोबाईलमध्ये पोलिसांना काही फोटो सापडले. या फोटोंमध्ये विजयच्या हातात बंदूक असल्याचे दिसते आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, विजय आणि छोटू दोघेही बंदुकीसोबत सेल्फी घेत होते. त्यावेळी अचानक गोळी सुटून विजयच्या डोक्यातून आरपार गेली. मात्र पोलिसांच्या या अंदाजाला विजयच्या नातेवाईकांनी फेटाळले आहे.
विजयच्या मृत्यूचे नेमके कारण तपासाअंती समोर येईलच. मात्र या घटनेमुळे सेल्फीची क्रेझ किती भयंकर आहे, हे पुन्हा एकदा समोर आले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
बीड
भारत
Advertisement