एक्स्प्लोर
पत्नीला भोसकल्यानंतर पतीची गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या
त्यानंतर बोलण्यासाठी तो पत्नीला गच्चीवर घेऊन गेला. परंतु तिथे त्यांच्यात वाद झाला.
नवी दिल्ली : पत्नीला भोसकल्यानंतर 40 वर्षीय इसमाने गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना दिल्लीतील रोहिनी परिसरात घडली आहे.
जसविंदर सिंह नावाचा इसम रविवारी रात्री पत्नीला भेटण्यासाठी तिच्या माहेरी गेला होता, त्यावेळी ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं.
जसविंदर पत्नीला भेटण्यासाठी पोहोचला त्यावेळी तिचा 13 वर्षीय भाऊ आणि बहिणही तिथे उपस्थित होते. त्यानंतर बोलण्यासाठी तो पत्नीला गच्चीवर घेऊन गेला. परंतु तिथे त्यांच्यात वाद झाला.
रागाच्या भरात त्याने पत्नीला चाकूने भोसकलं. त्यानंतर गच्चीवरुन उडी मारली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नीवर बीएसए रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या दाम्पत्याला चार वर्षांची मुलगी असून त्यांचं पाच वर्षांपूर्वी लग्न झालं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement