Mamata Banerjee : सात दिवसांचा वेळ देतेय नाहीतर... ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला का दिलं अल्टिमेटम?
Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला सात दिवसांचं अल्टिमेटम देत केंद्रीय योजनांशी संबंधित निधी देण्याची मागणी केलीये.
मुंबई : इंडिया आघाडीतून बाहेर पडल्यानंतर स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यानंतर आता पश्चिम बंगालच्या (West Bangal) मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना सात दिवसांचे केंद्र सरकारला अल्टिमेटम दिलं आहे. शुक्रवार 26 जानेवारी रोजी थकबाकी रक्कम सात दिवसांच्या देण्याचे आवाहन केल आहे. तसेच जर केंद्र सरकारने सात दिवासांच्या आत ही रक्कम परत केली नाही तर पक्षाकडून तीव्र निदर्शने करण्यात येतील.
मागील काही दिवसांपासून इंडिया आघाडीमध्ये बिघाड सुरु असल्याचं चित्र होतं. त्यातच ममता बॅनर्जी यांनी सुरुवातीला इंडिया आघाडीतील पक्षांना इशारा दिला होता. त्यानंतर त्यांनी निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली. यामुळे इंडिया आघाडीतून ममता बॅनर्जी यांना माघार घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यातच आता ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला अल्टिमेटम दिलं आहे.
केंद्र सरकारकडे पश्चिम बंगालचे इतके रुपये थकीत
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल सरकारच्या आकडेवारीचा हवाला देत सांगण्यात आलं आहे की, केंद्र सरकारकडे पश्चिम बंगालची मोठी रक्कम थकीत आहे. तसेच अहवालानुसार,प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (पीएमएवाय) राज्याचे केंद्र सरकारकडे 9,330 कोटी रुपये, मनरेगा अंतर्गत 6,900 कोटी रुपये, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 830 कोटी रुपये, पीएम ग्राम सडक योजनेंतर्गत 770 कोटी रुपये आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 770 कोटी रुपये थकीत आहेत. याशिवाय मिड-डे मिल अंतर्गत 175 कोटी रुपये आणि अन्य योजनाअंतर्गत देखील काही रक्कम थकीत असल्याची माहिती देण्यात आलीये.
याचसंदर्भात ममता बॅनर्जी यांनी घेतली होती पंतप्रधान मोदींची भेट
ममता बॅनर्जी यांनी 20 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन प्रलंबित केंद्रीय निधीच्या मुद्द्यावर चर्चा केली होती. राज्यातील आणि केंद्रातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या मुद्द्यावर तोडगा काढण्याचा प्रस्ताव ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमोर ठेवला होता. पण या गोष्टीला देखील बराच काळ उलटला तरीही याप्रकरणी कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा दावा पश्चिम बंगालच्या सरकारकडून केला जात आहे.
दरम्यान मागील काही काळांपासून केंद्र सरकार आणि ममता बॅनर्जी यांचे संबंध फार तणावपूर्वक असल्याचं पाहायला मिळालं आहे. तसेच ईडी सीबीआय यांसारख्या केंद्रीय यंत्रणांमुळे ममता बॅनर्जी यांनी वारंवार सरकारवर निशाणा देखील साधला होता.