Live Blog Updates: कित्येक पिढ्यांचे घाव आज भरलेत, कर्म आणि कर्तव्याचे प्रतीक म्हणजे धर्मध्वज : पंतप्रधान नरेंद्र मोदी
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
LIVE

Background
Maharashtra Live Blog Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराला भेट देणार आहेत. देशातील सामाजिक-सांस्कृतिक आणि अध्यात्मिक क्षेत्रातील हा एक महत्त्वाचा प्रसंग ठरणार आहे. सकाळी 10 वाजताच्या सुमाराला, पंतप्रधान महर्षी वसिष्ठ, महर्षि विश्वामित्र, महर्षि अगस्त्य, महर्षि वाल्मिकी, देवी अहिल्या, निषादराज गुहा आणि माता शबरी यांच्याशी संबंधित मंदिरांचा समावेश असलेल्या सप्तमंदिराला भेट देतील. यानंतर ते शेषावतार मंदिरालाही भेट देणार आहेत.सकाळी 11 वाजताच्या सुमाराला, पंतप्रधान माता अन्नपूर्णा मंदिराला भेट देतील. यानंतर, ते राम दरबार गर्भगृहात दर्शन आणि पूजा करतील, त्यानंतर ते रामलल्ला गर्भगृहात दर्शन करतील. दुपारी 12 वाजण्याच्या सुमाराला, पंतप्रधान अयोध्येतील पवित्र श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर समारंभपूर्वक भगवा ध्वज फडकवतील. ही घटना मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याचे आणि सांस्कृतिक उत्सव तसेच राष्ट्रीय एकात्मतेच्या नव्या अध्यायाची सुरुवात झाल्याचे प्रतीक ठरणार आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
परभणीचे सोनपेठ शहर कडकडीत बंद , मालेगावच्या डोंगराळे गावतील घटनेचा निषेध
परभणीचे सोनपेठ शहर कडकडीत बंद तर ताडकळस मध्ये चिमुकले उतरले रस्त्यावर
मालेगावच्या डोंगराळे गावतील घटनेचा निषेध करत केली कारवाईची मागणी
नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षांच्या मूलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ आज परभणीचे सोनपेठ शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले तसेच पूर्णा तालुक्यातील ताडकळस शहरात आज चिमुकल्या शाळकरी मुलांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेवून रस्त्यावर उतरत मोर्चा काढला आणि या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील श्रीराम मंदिरावर भगवा ध्वज फडकवताच ठाण्यात घंटानाद...
Anchor:-अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाच्या पूर्णत्वाचं प्रतिक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ११. ५५ मिनिटांनी अयोध्येतील श्रीरामाच्या मंदिरावर भगवा ध्वज फडकवण्यात आला. मोदींच्या हस्ते अयोध्येतील श्रीराम मंदिरावर भगवा ध्वज फडकवताच ठाण्यातील मंदिरांमध्ये तसेच काही घराघरात घंटानाद करण्यात आला. हा घंटानाद ११. ५५ ते १२. १० असा २० मिनिटे सुरु होता.
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या शिखरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत भगवा धर्मध्वज फडकवला. या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनीदेश-विदेशातील रामभक्तांना मंदिर पूर्णत्वाचा संदेश दिला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होता यावे यासाठी ध्वज फडकताच देशभरातील अनेक मठ-मंदिरांमध्ये आणि सनातनी घरांमध्ये घंटानाद करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार, ठाण्यातील श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्यावतीने ठाण्यातील मंदिर, मठ व्यवस्थापकांना तसेच नागरिकांना आवाहन करण्यात आले होते की मोदी यांच्या हस्ते आयोध्येतील श्रीराम मंदिरावर भगवा ध्वज फडकताच घराघरात तसेच मंदिरांमध्ये घंटानाद करण्यात यावे. या आवाहनाला प्रतिसाद देत ठाण्यातील मंदिर, मठ तसेच काही घराघरांमध्ये घंटानाद होताना दिसून आले. ठाण्यातील घंटाळी परिसरात असलेल्या प्राचीन आणि ऐतिहासिक घंटाळी मंदिरात घंटानाद करण्यात आला. यावेळी श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य, घंटाळी मंदिराचे व्यवस्थापक सदस्य आणि परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
असा आहे भगवा ध्वज...
या विशेष भगव्या ध्वजावर सूर्यवंशाची प्रतीक चिन्हे आहेत. श्रीराम मंदिराच्या १६१ फूट उंच शिखरावर ४२ फूटाचा स्तंभ बसवण्यात आला आहे. या स्तंभावर २२ फूट लांब आणि ११ फूट रुंद असा हा भगवा-केशरी ध्वज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते फडकविण्यात आला आहे. हा ध्वज सुमारे ४ किलोमीटर दूरूनही दिसणार आहे. त्यासाठी राम मंदिरात ऑटोमॅटिक फ्लॅग होस्टिंग सिस्टम बसवण्यात आली आहे. भविष्यात ध्वज बदलण्यासाठीही हीच सिस्टम वापरली जाईल. वारा जोरात वाहिल्यास ध्वज ३६० डिग्री फिरू शकतो अशी व्यवस्था आहे























