एक्स्प्लोर
Advertisement
भीमा-कोरेगाव घटनेत कारस्थान आणि त्रुटी, राज्य सरकारचा केंद्राला अहवाल
राज्य सरकारने भीमा-कोरेगावात घडलेल्या वास्तववादी घटनांचा अहवाल गृहमंत्रालयाला पाठवला आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्र सरकारने भीमा कोरेगाव दगडफेकीचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवला आहे. या घटनेदरम्यान प्रशासनाच्या त्रुटी राहिल्या आणि षडयंत्र रचलं गेलं, असं राज्य सरकारने अहवालात म्हटलं आहे.
1 जानेवारीला भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला 200 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना तिथे दोन गटांमध्ये वाद उफाळला. त्या वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली.
या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.
राज्य सरकारने भीमा-कोरेगावात घडलेल्या वास्तववादी घटनांचा अहवाल गृहमंत्रालयाला पाठवला आहे. प्रशासकीय पातळीवर कोणत्या त्रुटी राहिल्या होत्या, त्या न्यायालयीन चौकशीतून समोर येतील, असं राज्य सरकारने म्हटलं आहे.
परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्रीय गृहमंत्रालय समन्वय साधून आहेत. तसंच पक्षीय पातळीवरही भाजप या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी रावसाहेब दानवे आणि आशिष शेलार यांच्याकडून प्रकाराची माहिती घेतली आहे.
दरम्यान, राज्य सरकारने असा अहवाल पाठवला नसल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
मुंबई पूर्वपदावर, रेल्वे, मेट्रो आणि रस्ते वाहतूक सुरु
‘महाराष्ट्र बंद’ मागे, प्रकाश आंबेडकरांची घोषणा
पुण्यात जिग्नेश मेवाणी, उमर खालिदविरोधात पोलिसात तक्रार
भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे भाजप आणि संघाचा हात : मायावती
पुण्यातील सणसवाडीत दोन गटात वाद, परिस्थिती नियंत्रणात सरकारने पुरेशी खबरदारी घ्यायला हवी होती : शरद पवार सणसवाडी दगडफेकीची न्यायालयीन चौकशी होणार : मुख्यमंत्री सणसवाडी दगडफेकीच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद दगडफेकीप्रकरणी भिडे गुरुजी, मिलिंद एकबोटेंवर गुन्हा याकूबप्रमाणे संभाजी भिडे, एकबोटेंवर गुन्हे दाखल करा: आंबेडकरअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
पुणे
Advertisement