CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शरयू तीरावरून महाआरती; सीएम योगी आणि पीएम मोदींचे मानले आभार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अयोध्या दौऱ्यात जोरदार शक्तीपदर्शन केले. आज दिवसभरात निर्माणाधीन अयोध्येतील राम मंदिराची पाहणी केल्यानंतर सायंकाळी शरयू नदीच्या तीरावर आरती केली.
![CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शरयू तीरावरून महाआरती; सीएम योगी आणि पीएम मोदींचे मानले आभार Maha Aarti from Sharyu river by Chief Minister Eknath Shinde says thanks to CM Yogi and PM Modi CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शरयू तीरावरून महाआरती; सीएम योगी आणि पीएम मोदींचे मानले आभार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/09/b06976dee2aead5279d11e4e7abda9101681048064493444_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अयोध्या दौऱ्यात जोरदार शक्तीपदर्शन केले. आज दिवसभरात निर्माणाधीन अयोध्येतील राम मंदिराची पाहणी केल्यानंतर सायंकाळी शरयू नदीच्या तीरावर आरती केली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री दादा भूसे, गिरीश महाजन, शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. आरतीसाठी शरयू नदीच्या तीर फुलांनी सजवण्यात आला होता. महाआरतीनंतर मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले. दौऱ्याचे आयोजन करणाऱ्यांचे त्यांनी विशेष करून आभार मानले. लखनऊपासून अयोध्येपर्यंत वातावरण निर्मिती केल्याचे त्यांनी सांगितले. अयोध्या दौरा यशस्वी झाल्याचे ते म्हणाले. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ,पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दौरा आयोजित करण्यासाठी पोलिसांसह प्रशासनाचे आभार मानले.
तत्पूर्वी, त्यांनी अयोध्या दौऱ्यातून पत्रकार परिषद विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर दिले. त्यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा राम मंदिराचे स्वप्न पाहिलं होतं. आजचा दिवस माझ्या जीवनातील सौभाग्याचा दिवस आहे. मी आजचा दिवस कधीच विसरु शकणार नाही असे शिंदे म्हणाले.
राम मंदिर आणि अयोध्या हा आमच्यासाठी राजकीय मुद्दा नाही
एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, श्रीरामाच्या आशीर्वादाने आम्हाला पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळालं. आमच्या कार्यकर्त्यांनी यात्रेचं अत्यंत चांगलं नियोजन केलं. राम मंदिर आणि अयोध्या हा आमच्यासाठी राजकीय मुद्दा नाही. विकासाची अनेक कामं याठिकाणी होत आहेत. त्याबबदल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मंदिराचे अतिशय वेगानं काम सुरु असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. सीएम शिंदे म्हणाले की, रावणराज आहे असे म्हणणाऱ्यांना आता मी सांगेन की (अपक्ष) खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा, ज्यांनी हनुमान चालीसाचे पठण केले, त्यांना देशद्रोहाच्या कायद्याखाली तुरुंगात टाकण्याचे पाप केले. तो रावण की राम? सीएम शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात केली आहे. तत्पूर्वी, सकाळी अयोध्येतील रामकथा हेलिपॅडवर उतरल्यानंतर शिंदे यांनी आधी रामलल्ला आणि नंतर हनुमानगढीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कैसरगंजचे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह होते.
रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सर्वात मोठा आनंद म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न, लाखो रामभक्तांचे स्वप्न असलेलं अयोध्येत भव्य राम मंदिर व्हावे असे होते, ते पूर्ण होत आहे. अयोध्येला जाण्यापूर्वी सीएम शिंदे यांनी लखनऊमध्ये माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, प्रवासात वेगळेपणाची भावना आहे. प्रभू रामाच्या कृपेने धनुष्यबाण मिळाले, पक्षाचे नावही मिळाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मी रामाचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. आपल्या सर्व सहकारी नेते, मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांसाठी हा भाग्याचा दिवस आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)