Borewell Accident : झुंज अपयशी... बोअरवेलमध्ये अडकलेल्या तन्मयचा मृत्यू; चार दिवस सुरु होतं बचावकार्य
Betul Borewell Incident : आठ वर्षांचा तन्मय 6 डिसेंबर रोजी 55 फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला होता. साडेचार दिवस चाललेल्या बचावकार्यानंतर तन्मयचा मृतदेह सापडला आहे.
MP Boy Still Stuck in Borewell : बोअरवेलमध्ये (Borewell) अडकलेल्या तन्मयची (Tanmay fell in Borewell) झुंज अपयशी ठरली आहे. चार दिवसांहून अधिक वेळ चाललेल्या बचावकार्यानंतर तन्मयचा मृतदेह सापडला आहे. मध्य प्रदेशमध्ये 8 वर्षांचा तन्मय साहू (Tanmay Sahu) 6 डिसेंबर रोजी 55 फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला होता. एनडीआरएफच्या (NDRF) पथकाकडून बोअरवेलमध्ये अडकलेल्या तन्मयला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र तन्मयचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आला आहे. मध्य प्रदेश बेतुलमध्ये ही दुर्घटना घडली आहे.
शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात
बेतुलचे सहाय्यक जिल्हा दंडाधिकारी (ADM) एस. जयस्वाल यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, तन्मय साहूच्या मृतदेहाचं शवविच्छेदन पूर्ण झालं आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शवविच्छेदन अहवालात गुदमरणे आणि बरगड्यांना झालेली दुखापत हे मृत्यूचं कारण असल्याचं स्पष्ट झालं आहे. नातेवाईक बेतूल जिल्हा रुग्णालयातून तन्मयचा मृतदेह ताब्यात घेऊन मांडवी गावाकडे रवाना झाले आहेत.
दुःख की इस घड़ी में तन्मय का परिवार स्वयं को अकेला न समझे, मैं और संपूर्ण मध्यप्रदेश परिवार के साथ है।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) December 10, 2022
राज्य सरकार की ओर से पीड़ित परिवार को ₹4 लाख की आर्थिक सहायता दी जायेगी। ईश्वर दिवंगत आत्मा को अपने श्री चरणों में स्थान दें। विनम्र श्रद्धांजलि!
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडून श्रद्धांजली
दरम्यान, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (CM Shivraj Singh Chouhan) यांनी ट्वीट करत या दुर्गटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, 'या दुःखाच्या वेळी आम्ही तन्मयच्या कुटुंबीयांच्यासोबत आहोत, त्यांनी स्वतःला एकटं समजू नये. मी आणि संपूर्ण मध्य प्रदेश तन्मयच्या कुटुंबासोबत आहोत. राज्य सरकारकडून पीडित कुटुंबाला 4 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. ईश्वरचरणी तन्मयच्या आत्म्यास शांती लाभो. श्रद्धांजली!'