(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kubeshwar Dham: मध्य प्रदेशातील कुबेश्वर धामातील रुद्राक्ष महोत्सवात रुद्राक्ष मिळवण्यासाठी भाविकांची झुंबड,चेंगराचेंगरीत बुलढाणा, अकोल्याच्या महिला बेपत्ता
Kubeshwar Dham Sehore: पातूर तालुक्यातील सस्ती गावातील दोन महिला तर अकोला शहरातील शिवसेना वसाहत भागातील दोन महिला बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे.
भोपाळ : मध्यप्रदेशातील भोपालनजीकच्या सिहोरच्या कुबेश्वर धाम येथे आयोजित 'रूद्राक्ष महोत्सवाच' आयोजन करण्यात आले आहे. पंडीत प्रदीप मिश्रा यांनी हा महोत्सव आयोजित केला आहे. महोत्सवात रुद्राक्ष मिळविण्यासाठी देशभरातून लाखोंची गर्दी झाली आहे. या महोत्सवात महाराष्ट्रातूनही हजारो लोक गेले आहेत. या वेळी मोफत रुद्राक्ष घेण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे गोंधळ उडाल्याची घटना घडली या गोंधळात बुलढाण्याचा खामगाव तालुक्यातील तीन महिला बेपत्ता झाल्याचं समोर आलंय. या महिलांशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी खामगाव पोलिसात तक्रार दाखल केलीये
अकोला जिल्ह्यातील चार महिला बेपत्ता
अकोला जिल्ह्यातील चार महिला सध्या बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. यात पातूर तालुक्यातील सस्ती गावातील दोन महिला तर अकोला शहरातील शिवसेना वसाहत भागातील दोन महिला बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. शिवहोर येथे तर वाहनांच्या 20 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याची माहिती आहे. याच महोत्सवात गर्दीमुळे प्रचंड गोंधळ उडालेला आहे. यात अनेक जिल्ह्यातील लोक सध्या बेपत्ता असल्याने कुटुंबिय चिंतेत आहेत.
गेल्या वर्षभरात पंडित मिश्रा महाराज यांची ख्याती जगभर पसरली असून त्यांना मानणारा मोठा वर्ग निर्माण झाला आहे. शिवरात्रीनिमित्ताने दर्शनासाठी भाविक जात आहेत. त्याच महत्वाचं कारण म्हणजे रुद्राक्ष मानवी जीवन बदलते आणि पवित्र स्थान असलेल्या सिहोरचे रुद्राक्ष फायदेशीर असल्याचं महाराज सांगतात. तसेच महाराजांनी सुचवलेले उपाय आणि प्रवचन उत्तम असल्याने त्यांच्यावरील निष्ठा दिवसेंदिवस वाढत आहे.
गेल्या वर्षी देखील मार्च महिन्यात सिहोर येथे रुद्राक्ष वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आठ दिवसात 15 लाख भाविक येथील अशी अपेक्षा असताना पहिल्याच दिवशी पाच लाख भाविक पोहचले आणि गोंधळ उडाला. महामार्ग ठप्प झाले. भाविकांचे हाल होऊ लागले. प्रशासन आणि आयोजकांनी केलेले सर्व नियोजन कोलमडले. नाईलाजाने कथा मध्येच सोडून रुद्राक्ष वाटप स्थगित करीत असल्याचे पंडित प्रदीप मिश्रा यांनी जाहीर केले होते. सलग दुसऱ्या वर्षी सोशल मीडियावर प्रदीप मिश्रा यांचा चांगला प्रचार झाला. परिणामी या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा अधिक गर्दी वाढली आणि गोंधळ उडाला