एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Indore रामनवमीच्या दिवशी इंदूरमध्ये मोठी दुर्घटना, मंदिरातील विहिरीवरील छत कोसळल्याने 25 हून अधिक जण पडले

मध्य प्रदेशातील इंदूरमधल्या पटेल नगरमध्ये श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिराच्या आवारात बांधलेल्या विहिरीवरील छत कोसळूल्याने 25 हून अधिक जण विहिरीत पडले.

Indore Accident : देशभरात आज रामनवमीचा (Ram Navami 2023) उत्साह असतानाच मध्य प्रदेशातील इंदूरमधून (Indore) धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंदूरमध्ये रामनवमीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली. स्नेह नगरजवळील पटेल नगरमध्ये श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिराच्या आवारात बांधलेल्या विहिरीवरील (Well) छत कोसळल्याने 25 हून अधिक जण विहिरीत पडले. आतापर्यंत चार जणांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दुर्घटनेनंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं. तर अरुंद रस्त्यांमुळे मदतकार्य करण्यात अडचणी येत आहेत. दोरी टाकून विहिरीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. तर बचाव पथकातील जवान विहिरीत उतरुन अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

विहिरीत पडलेल्या लोकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अपघातानंतरही बराच वेळ अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि अॅम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचलेल्या नव्हत्या. तर या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, नगरसेवक यांच्यासह प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. इंदूरचे महापौर पुष्यमित्र भार्गव यांच्यासह सर्व एमआयसी सदस्य बैठक सोडून अपघातस्थळी निघाले. यासोबतच अनेक राजकारणीही पोहोचले आहे. मदतकार्यासाठी डायव्हर्सना पाचारण करण्यात आलं आहे.

विहीर सुमारे 50 फूट खोल असल्याची माहिती

रामनवमीच्या निमित्ताने मंदिरात हवनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात सहभागी होण्यासाठी लोक मोठ्या संख्येने मंदिरात हजर होते. लोक पूजा अर्चा करत होते. तर त्यात मंदिराता एक पायऱ्यांची विहिर होती, ज्यावर दहा वर्षांपूर्वी छत टाकण्यात आलं होतं. पूजेच्या वेळी 20 ते 25 लोक विहिरीच्या छतावर उभे होते, त्याच वेळी छत खचलं. छत कोसळल्याने सुमारे 20 ते 25 जण विहिरीत पडले. दरम्यान ही विहीर सुमारे 50 फूट खोल असल्याचं सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

दरम्यान बेलेश्वर महादेव मंदिरातील या दुर्घटनेची मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दखल घेतली आहे. शिवराज सिंह यांनी इंदूरचे जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना फोन करुन बचाव कार्याला गती देण्याच्या सूचना केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांचे कार्यालय इंदूर जिल्हा प्रशासनाच्या सतत्याने संपर्कात आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NTPC चं तगडं प्लॅनिंग, अणू ऊर्जा क्षेत्रात 4 लाख कोटींची गुंतवणूक करणार, शेअरमध्ये तेजी येणार?
NTPC चं तगडं प्लॅनिंग, अणू ऊर्जा क्षेत्रात 4 लाख कोटींची गुंतवणूक करणार, शेअरमध्ये तेजी येणार?
Chhagan Bhujbal : शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडताच भुजबळांची फडणवीसांसाठी जोरदार बॅटिंग; म्हणाले, 132 आमदार निवडून आल्यानंतर...
शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडताच भुजबळांची फडणवीसांसाठी जोरदार बॅटिंग; म्हणाले, 132 आमदार निवडून आल्यानंतर...
S. Jaishankar and Kyoko Somekawa Love Story : जपानी महिलेशी विवाह केलेल्या परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची अनोखी लव्हस्टोरी माहीत आहे का?
जपानी महिलेशी विवाह केलेल्या परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची अनोखी लव्हस्टोरी माहीत आहे का?
Gondia Crime: धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut PC FULL : मविआशी काडीमोड? पालिका स्वबळावर?  संजय राऊतांचं मोठ वक्तव्यPuneKar on Next CM | पुणेकरांना मुख्यमंत्री कोण हवाय? वाफळता चहा; राजकारणावर गरमागरम चर्चाPunekar on CM Maharashtra  : मुख्यमंत्री कोण हवा, पुणेकरांचं मत काय...Ahilyanagar Cold Wave | नगरकर गारठले, निचांकी तापमानाची नोंद; जागोजागी शेकोट्या पेटल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NTPC चं तगडं प्लॅनिंग, अणू ऊर्जा क्षेत्रात 4 लाख कोटींची गुंतवणूक करणार, शेअरमध्ये तेजी येणार?
NTPC चं तगडं प्लॅनिंग, अणू ऊर्जा क्षेत्रात 4 लाख कोटींची गुंतवणूक करणार, शेअरमध्ये तेजी येणार?
Chhagan Bhujbal : शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडताच भुजबळांची फडणवीसांसाठी जोरदार बॅटिंग; म्हणाले, 132 आमदार निवडून आल्यानंतर...
शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडताच भुजबळांची फडणवीसांसाठी जोरदार बॅटिंग; म्हणाले, 132 आमदार निवडून आल्यानंतर...
S. Jaishankar and Kyoko Somekawa Love Story : जपानी महिलेशी विवाह केलेल्या परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची अनोखी लव्हस्टोरी माहीत आहे का?
जपानी महिलेशी विवाह केलेल्या परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची अनोखी लव्हस्टोरी माहीत आहे का?
Gondia Crime: धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
Maharashtra Cabinet: भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
Sanjay Raut : ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Pune Crime : निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
Embed widget