Madhya Pradesh: निर्दोष असूनही 13 वर्ष तुरूंगात खितपत; 42 लाखांची नुकसान भरपाई देण्याचा न्यायालयाचा आदेश
मध्य प्रदेश (Madhya Pradesh) उच्च न्यायालयनं सरकारला त्या व्याक्तीला 42 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेशही दिला आहे.
MP News : मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) एका निरपराध व्यक्तीला त्यानं न केलेल्या गुन्ह्याबद्दल 4 हजार 740 दिवस म्हणजेच जवळपास 13 वर्षाचा तुरुंगावास भोगावा लागला आहे. आता मध्य प्रदेशाच्या उच्च न्यायालयानं त्याची निर्दोष मुक्तता केली आहे. तसेच मध्य प्रदेश उच्च न्यायालयनं सरकारला त्याला 42 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेशही दिला आहे.
काय आहे प्रकरण?
बालाघाट येथील चंद्रेश मर्सकोले याच्यावर प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह नदीत फेकल्याचा आरोप आहे. ही घटना 19 ऑगस्ट 2008 रोजी घडली. 31 जुलै 2009 रोजी भोपाळ सत्र न्यायालयाने चंद्रेशला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. चंद्रेश हा एमबीबीएसच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. घटनेच्या दिवशी त्यांनी वरिष्ठ निवासी डॉक्टर हेमंत वर्मा यांच्याकडे होशंगाबादला जाण्यासाठी गाडी मागितली होती. आधी त्याने प्रेयसीची हत्या केली आणि नंतर तिचा मृतदेह पचमढी येथील रावी नदीत फेकला, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता.
जन्मठेपेची शिक्षा झालेल्या व्यक्तीची उच्च न्यायालय निर्दोष मुक्तता केली
कनिष्ठ न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या व्यक्तीची मध्य प्रदेशाच्या उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आणि त्याला नुकसानभरपाई देण्याचे निर्देशही दिले. न्यायमूर्ती अतुल श्रीधरन आणि न्यायमूर्ती सुनीता यादव यांच्या खंडपीठाने सांगितले की, चुकीच्या निर्णयामुळे त्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्यच विस्कळीत झाले आहे. कोर्टानं सांगितलं की, दोषी नसून देखील या व्याक्तीला 13 वर्ष तुरूंगावास भोगावा लागला. त्यामुळे आता सरकारला त्याला 42 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागेल. न्यायालयाने सरकारला ही रक्कम 90 दिवसांच्या आत भरण्यास सांगितले आहे, असे न केल्यास वार्षिक 9 टक्के व्याजही भरावे लागेल. न्यायालयाने सांगितले की, तुरुंगावासात असलेला व्यक्तीचा खटला चालवल्यामुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकारच्या विरोधात सक्षम मंचातही अपील करू शकतो.
शिक्षेविरोधात चंद्रेश यांनी उच्च न्यायालयात अपील केले होते
चंद्रेश सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरोधात हायकोर्टात अपिल केली. त्यांच्या वतीने अधिवक्ता एच.आर. नायडू हजर झाले. की डॉ. हेमंत वर्मा यांनी हा खून केला होता आणि स्वतःचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी चंद्रेशला खोट्या प्रकरणात अडकवले, असा युक्तिवाद त्यांनी केला.
न्यायालयाने म्हटले की, संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास केल्यावर असे दिसून येते की पोलिसांनी मुख्य आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला. कोर्टानं सांगितलं की, हा संपूर्ण प्रकरणाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही.तपासात खुनाचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :