एक्स्प्लोर

शिवराज सिंह चौहान मंत्रिमंडळाचा विस्तार, 20 कॅबिनेटसह 8 राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ

मध्यप्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान मंत्रीमंडळाचा आज दुसरा विस्तार करण्यात आला. राज्यपाल आनंदी बेन पटेल यांनी राजभवनात नवीन मंत्र्यांना शपथ दिली. एकूण 28 मंत्र्यांनी आज शपथ घेतली. यात 20 कॅबिनेट मंत्री आणि 8 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे.

भोपाळ: मध्यप्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान मंत्रीमंडळाचा आज दुसरा विस्तार करण्यात आला.  राज्यपाल आनंदी बेन पटेल यांनी राजभवनात नवीन मंत्र्यांना शपथ दिली. एकूण 28 मंत्र्यांनी आज शपथ घेतली. यात 20 कॅबिनेट मंत्री आणि 8 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे.  यात गोपाल भार्गव, विजय शाह, यशोधरा राजे सिंधिया यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. यांनी घेतली शपथ राजभवनात  राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली.  गोपाल भार्गव, विजय शाह, जगदीश देवडा, बिसाहूलाल सिंह, यशोधरा राजे सिंधिया, भूपेंद्र सिंह, एंदल सिंह कसाना, बृजेंद्र प्रताप सिंह, विश्वास सारंग, इमरती देवी, प्रभुराम चौधरी, प्रद्युम्न सिंह तोमर, ओम प्रकाश सकलेचा, उषा ठाकुर, प्रेम सिंह पटेल, हरदीप सिंह डंग, महेंद्र सिंह सिसोदिया, अरविंद सिंह भदौरिया, डॉ. मोहन यादव आणि राज्यवर्धन सिंह यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. तर भारत सिंह कुशवाहा, इंदर सिंह परमार, रामखेलावन पटेल, रामकिशोर कांवरे, बृजेंद्र सिंह यादव, गिरिराज डंडोदिया, सुरेश धाकड आणि ओपीएस भदौरिया यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया समर्थक सहा मंत्र्यांसह 22 आमदारांनी काँग्रेसला राम राम ठोकत राजीनामा दिल्याने कमलनाथ यांना राजीनामा द्यावा लागला होता. कमलनाथ यांचं सरकार 15 महिन्यांचंच राहिलं.  शिवराज चौहान यांनी 23 मार्च रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. कोरोना व्हायरस महामारी आणि लॉकडाऊन दरम्यान जवळपास एक महिनाभर एकट्यानेच सरकारचा गाडा चालवला होता. 24 जागांवर होणार पोटनिवडणूक मध्य प्रदेश भाजपकडे जुन्या आमदारांची फौज आहे. येत्या काळात 24 जागांच्या पोटनिवडणुका होणार आहेत. या जागा जिंकण्याचं आव्हान भाजपसमोर आहे.  त्यामुळं पक्षाचं ध्यान त्या जागा जिंकण्याकडे आहे.  काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाला रामराम करीत भाजपात प्रवेश केल्याने त्यांच्या 22 समर्थकांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे काँग्रेसचे कमलनाथ सरकार अल्पमतात आले होते. त्यानंतर 22 मार्च रोजी कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : अध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल, एलन मस्क देखील संकटात
डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्ष होताच पहिला धक्का, गुन्हा दाखल; एलन मस्क देखील संकटात
Kolhapur Guardian Minister : मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kho Kho World cup| खो-खोने आम्हाला नॅशनल लेव्हलपर्यंत पोहोचवलं, कर्णधार प्रतीक वायकरची प्रतिक्रियाSaif Case Recreate Seen : सीन रिक्रिएशनसाठी आरोपी शेहजाद सैफच्या घरी, क्राईम ब्रँच घटनास्थळीABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 January  2025Akshay Shinde Case | अक्षय शिंदेचा फेक , पोलिसांचा दावा संशयास्पद ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : अध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल, एलन मस्क देखील संकटात
डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्ष होताच पहिला धक्का, गुन्हा दाखल; एलन मस्क देखील संकटात
Kolhapur Guardian Minister : मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Beed News: बीड जिल्ह्यात मोठी घडामोड, 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका; सदस्यत्त्व रद्द केले
मोठी बातमी: बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका
Mhada Lottery Konkan Board : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
Haribhau Bagde : विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Embed widget