(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhopal Fire : भोपाळमधील कमला नेहरू रुग्णालयात लहान मुलांच्या वॉर्डला आग, 4 बालकं दगावली
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, भोपाळमधील कमला नेहरू रुग्णालयातील मुलांच्या वॉर्डमध्ये झालेली आगीची घटना दुःखद आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत."
Bhopal Fire At Kamla Nehru Hospital : भोपाळच्या कमला नेहरू रुग्णालयातील मुलांच्या वॉर्डमध्ये आग लागली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग घटनास्थळी स्वत: उपस्थित आहे. या घटनेत चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अनेक मुले जखमी झाली आहेत. दरम्यान, कमला नेहरू रुग्णालयाबाहेर थांबलेल्या पालकांनी सांगितले की, 3-4 तास होऊनही त्यांना आपल्या मुलांची कोणतीही माहिती मिळालेली नाही.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. फतेहगड अग्निशमन केंद्राचे प्रभारी जुबेर खान यांनी सांगितले की, सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास रुग्णालयाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली. अग्निशमन दलाच्या सुमारे 8-10 गाड्या घटनास्थळी पोहोचून त्यांनी आग आटोक्यात आणण्यात आली.
या घटेनेला दुजोरा देत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्वीट केले की, “रुग्णालयातील मुलांच्या वॉर्डमध्ये आगीची घटना अत्यंत दुःखद आहे. बचावकार्य वेगाने पार पजले आणि आग आटोक्यात आणण्यात आली. परंतू दुर्दैवाने गंभीर आजारामुळे दाखल झालेल्या तीन मुलांना वाचवता आले नाही.”
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, भोपाळमधील कमला नेहरू रुग्णालयातील मुलांच्या वॉर्डमध्ये झालेली आगीची घटना दुःखद आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मोहम्मद सुलेमान हे याचा तपास करणार आहेत. या घटनेनंतर कुटुंबीय आपल्या मुलांच्या शोधात रुग्णालयाबाहेर दिसत होते.
दरम्यान महाराष्ट्रातील भंडाऱ्यात देखील काही महिन्यांपूर्वी अशीच घटना घडली होती. 9 जानेवारीला मध्यरात्री भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात मुलांच्या अतिदक्षता कक्षात लागलेल्या आगीत 10 नवजात बाकांचा होरपळून मृत्यू झाला होता. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आलं आहे. या प्रकरणी दोन नर्सविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शुभांगी सातवणे आणि स्मिता आंबिलढके असं या दोघींची नावं आहेत. या दोघींवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आलाय.