Lunar Eclipse 2021 : या वर्षीतील पहिलं चंद्रग्रहण आज, कुठे आणि कधी दिसणार? जाणून घ्या
आजचे चंद्रग्रहण हे 21 जानेवारी 2019 साली झालेल्या चंद्रग्रहणानंतरचे पहिलेच चंद्रग्रहण आहे परंतु ते भारतात दिसणार नाही.
नवी दिल्ली : आजच्या दिवशी बुद्ध पोर्णिमा आणि चंद्रग्रहण असा योगायोग जुळुन आला आहे. आज या वर्षातील पहिले चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2021) दिसणार आहे. खगोलतज्ज्ञांच्या मते, या आजचे चंद्रग्रहण हे एक पूर्ण चंद्र ग्रहण असणार आहे.
चंद्रग्रहणाची वेळ
आज दिसणारे चंद्रग्रहण हे भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 3 वाजून 15 मिनीटांनी सुरु होणार असून ते संध्याकाळी 7 वाजून 19 मिनीटांपर्यंत राहणार आहे. पूर्ण चंद्रग्रहणाच्या या घटनेला ब्लड मूनही म्हटलं जातं, कारण यावेळी चंद्र हा लालसर रंगाचा दिसतो. आजचे चंद्रग्रहण हे 21 जानेवारी 2019 साली झालेल्या चंद्रग्रहणानंतरचे पहिले चंद्रग्रहण आहे.
A lunar #eclipse is sometimes called a "blood moon," but the actual source of the red color is quite gentle: it's light filtered through all the sunrises and sunsets on Earth. Here's our video guide to #LunarEclipse2021 and how to see it on May 26: https://t.co/sDNOcwAxcF pic.twitter.com/cNYkKLCPho
— NASA Solar System (@NASASolarSystem) May 24, 2021
पूर्ण चंद्रग्रहण तेव्हा होते जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात. चंद्रग्रहण सुरु झाल्यानंतर सर्वात आधी चंद्र काळ्या रंगाचा दिसतो, त्यानंतर हळूहळू चंद्र संपूर्ण लाल रंगाचा दिसतो. ज्याला 'ब्लड मून' म्हणून संबोधलं जातं. ब्लड मून तेव्हाच दिसतो, ज्यावेळी चंद्र पृथ्वीच्या सावलीमध्ये लपतो आणि आकाशात लाल रंगाच्या प्रकाशात दिसून येतो. जगभरातील अनेक भागांत ब्लड मून 2021 दिसून येणार आहे. दरम्यान.
कुठे दिसणार चंद्रग्रहण?
आजचे चंद्रग्रहण हे भारतात दिसणार नाही. पूर्ण चंद्रग्रहण हे आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिकेतील बहुतांश भागांत, दक्षिण अमेरिका, प्रशांत महासागर, अटलांटिक, हिंद महासागर आणि अंटार्क्टिकामध्ये दिसून येणार आहे. जगातल्या काही शहरांमध्ये पूर्ण चंद्रग्रहण दिसण्याची शक्यता आहे. यामध्ये होनोलूलू, ह्यूस्टन, लॉस एंजिल्स, मनीला, मेलबर्न, सॅन फ्रांसिस्को, सियोल, शांघाई आणि टोक्योचा समावेश आहे. तसेच बँकॉक, शिकागो, ढाका, मॉन्ट्रियल, न्यूयॉर्क, टोरंटो आणि यांगून यांसारख्या शहरांमध्ये चंद्रग्रहण अंशिक स्वरुपात दिसून येईल.
महत्वाच्या बातम्या :