एक्स्प्लोर
Lunar Eclipse 2020 : आज वर्षातलं तिसरं चंद्रग्रहण; उपछाया चंद्रग्रहण भारतात दिसणार?
जुलै महिन्याच्या पहिल्या रविवारी आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी या वर्षातील तिसरे चंद्रग्रहण दिसणार आहे. गुरुपौर्णिमा आणि चंद्रग्रहण हा अद्भूत योग मानला जातो.
Lunar Eclipse 2020: हिंदू पंचांगानुसार आज आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णमेला 2020 सालातील तिसरे चंद्रग्रहण दिसणार आहे. हे उपछाया प्रकराचं चंद्रग्रहण असणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 8.38 ला ग्रहणाला सुरुवात होईल तर 11.21 मिनिटंनी संपेल. आज 5 जुलैला होणारं चंद्रग्रहण मात्र भारतातून दिसणार नाही. पण ऑस्ट्रेलिया, यूरोप, आफ्रिका आणि आशियातील काही भागात आजचं चंद्रग्रहण दिसणार आहे.
रविवार, 21 जून 2020 रोजी सूर्यग्रहण लागले. आता पंधरा दिवसाच्या अंतराने पुन्हा एकदा आज चंद्रग्रहण होणार आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये चंद्रग्रहण झाले होते.
ग्रहण म्हणजे काय?
जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत आणि एकाच प्रतलात येतात त्यावेळी त्यांच्यामध्ये एकप्रकारचा लपंडाव होतो. सावलीमुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्यामुळे सूर्य पृथ्वीवरून काही काळासाठी दिसत नाही, त्याला सूर्यग्रहण म्हणतात. तर पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे काही काळ चंद्र दिसत नाही त्याला चंद्रग्रहण असे म्हणतात.
ग्रहण केव्हा होते?
चंद्रग्रहण हे पौर्णिमेला तर सूर्यग्रहण हे नेहमीच अमावास्येला घडते. दर पौर्णिमा किंवा अमावास्येला सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एकाच प्रतालात नसतात त्यामुळे दर अमावस्या आणि पौर्णिमेला चंद्रग्रहण घडत नाही.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी उपछाया चंद्रग्रहण
चंद्रग्रहण ही एक खगोलीय स्थिती आहे. सूर्य, पृथ्वी आणि चंद्रा एका ओळीत असतात तेव्हा चंद्रग्रहण होते. मात्र चंद्राचा एकच भाग यावेळी लपवला जातो तेव्हा त्याला अर्ध चंद्रग्रहण असं म्हटलं जातं. चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावलीभोवतीच्या फिकट सावलीतून प्रवास होतो त्याला उपछाया ग्रहण म्हणतात.
कुठे दिसणार चंद्रग्रहण?
ऑस्ट्रेलिया, यूरोप, आफ्रिका आणि आशियातील काही भागात आजचं चंद्रग्रहण दिसणार आहे. हा ग्रहणाचा कालावधी सुमारे 2 तास 23 मिनिटांचा असेल. चंद्रग्रहणावेळी भारतात दिवस असल्यामुळे हे चंद्रग्रहण देशात दिसणार नाही.
या ग्रहण काळात काय करु शकतो?
उपछाया चंद्रग्रहण शास्त्रानुसार पूर्ण ग्रहणासारखे नसते. या ग्रहणात कोणतंही सुतक पाळलं जात नाही. त्यामुळे मंदिर, अथवा पूजेसाठी प्रतिबंध घालण्यात येणार नाहीत. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या शुभ कार्याला स्थगिती किंवा मनाई केली जाणार नाही. नेहमीप्रमाणे सर्व व्यवहार, पूजा, अर्चा, कुळधर्म कुलाचार करावेत, असे सांगितले जात आहे.
VIDEO | खग्रास चंद्रगहणाचा योग आणि ब्लडमूनचं महत्त्व, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमणांशी बातचीत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement