एक्स्प्लोर

यूपीत भगवाराज, लखनौतील हस हाऊसलाही भगवा रंग

जवळपास सर्व सरकारी कार्यालयांवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आवडता भगवा रंग चढला असल्याचं पाहायला मिळत आहे.

लखनौ : उत्तर प्रदेशात सरकार बदलल्यापासून भगवीकरण सुरु आहे. मुख्यमंत्री कार्यालय ते सरकारी वाहनं आणि सरकारी कॅलेंडरपासून ते डायरीपर्यंत भगव्या रंगाचा वापर केला जात आहे. आता लखनौतील हज हाऊसलाही भगवा रंग देण्यात आला आहे. जवळपास सर्व सरकारी कार्यालयांवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आवडता भगवा रंग चढला असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री सचिवालयानंतर आता उत्तर प्रदेश हज कमिटीच्या कार्यलयाच्या भिंतींनाही भगवा रंग दिला जात आहे. आतापर्यंत या भिंती पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या होत्या. भगवा रंग हा ऊर्जेचं प्रतिक आहे, त्यामुळे यावर वाद होऊ नये, असं उत्तर प्रदेशचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री मोहसिन राजा यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशात अनेक सरकारी बसेसनाही भगवा रंग देण्यात आला आहे, ज्याला खुद्द योगी आदित्यनाथ यांनी गेल्या महिन्यात हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं होतं. उत्तर प्रदेश सरकारकडून दरवर्षी एक सूचना डायरी प्रसिद्द केली जाते, ज्याची किंमत 120 रुपये आहे. सर्व मंत्री, आमदार, खासदार आणि अधिकाऱ्यांना ही डायरी मोफत दिली जाते. ही डायरीही आता भगव्या रंगाची झाली आहे. सध्या जेवढे सरकारी कार्यक्रम होतात, त्यामध्ये व्यासपीठापासून ते सोफ्यापर्यंत भगव्या रंगाचा वापर केला जातो. उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तर कार्यालयाचे पडदेही भगव्या रंगाचे घेतले आहेत. शिवाय काही सरकारी रुग्णालयांमध्ये बेडच्या चादरीही भगव्या आहेत. योगी आदित्यनाथ स्वतः भगव्या रंगाचे कपडे वापरतात. ते जिथेही जातात, तिथे त्यांच्या खुर्चीवर भगव्या रंगाचा टॉवेल टाकला जातो. उत्तर प्रदेशात ज्या पक्षाचं सरकार असतं, रंगही त्याचप्रमाणे बदलतो. समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांचं सरकार होतं तेव्हा सर्व कामकाज हिरव्या रंगात होत होतं. तर मायावती यांचं सरकार असताना निळ्या रंगाचा बोलबाला होता. आता उत्तर प्रदेशात भगवीकरण सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget