एक्स्प्लोर

Lucknow Accident Video : दारुच्या नशेत क्रेटा कार चालकाने पाच जणांना चिरडले, समोर येईल त्याला धडक; एक किमी पोलिस आणि जमावाकडून पाठलाग

Lucknow Accident Video : पोलिस आणि जमाव गाडीच्या मागे धावत आणि आरडाओरड करत राहिले, मात्र कार चालक थांबला नाही. अखेर हुसैनाबादमध्ये कार खांबाला धडकली, त्यानंतर जमावाने कारवर हल्ला केला.

Lucknow Accident Video : लखनौमध्ये क्रेटा कारने (Lucknow Accident Video) पाच जणांना चिरडल्याची घटना घडली. रात्री बाराच्या सुमारास रस्त्यावर उभ्या असलेल्या व्यक्तीला पहिल्यांदा धडक दिल्यानंतर त्यानंतर 1 किलोमीटरपर्यंत समोर येणाऱ्याला दारुड्या ड्रायव्हरने समोर येईल त्याला धडक मारली. पोलिस आणि जमाव गाडीच्या मागे धावत आणि आरडाओरड करत राहिले, मात्र कार चालक थांबला नाही. अखेर हुसैनाबादमध्ये कार खांबाला धडकली, त्यानंतर जमावाने कारवर हल्ला केला. पोलिसांनी मोठ्या प्रयत्नांनी कार चालकाला जमावापासून वाचवून पोलीस ठाण्यात नेले. मात्र जमावाने कारची मोडतोड केली. शहरातील सर्वाधिक वर्दळीचा परिसर असलेल्या घंटाघर आणि रुमी गेटजवळ ही घटना घडली. रात्रीची वेळ असल्याने गर्दी कमी होती, अन्यथा इतरांनाही याचा फटका बसू शकला असता.

लोक ओरडत राहिले, पण गाडी थांबली नाही

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 12 वाजता रूमी गेट येथे एका अनियंत्रित कारने प्रथम एका व्यक्तीला धडक दिली, मात्र चालकाने कार थांबवली नाही. उलट गाडीचा वेग वाढवला. त्यानंतर त्याने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. लोक गाडीच्या मागे धावू लागले. आरडाओरड करून थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र कार चालक थांबला नाही. त्याने ई-रिक्षाला धडक दिली. माहिती मिळताच पोलिस कर्मचाऱ्यांनीही गाडीचा पाठलाग सुरू केला. व्यक्ती आणि ई-रिक्षाला धडक दिल्यानंतर कारने छोटा इमामबारा ते घंटाघर दरम्यान 3 जणांना धडक दिली. गाडीचे नियंत्रण सुटलेले पाहून काही लोक जीव वाचवण्यासाठी धावले. पुढे जात असताना त्याने एका कारलाही धडक दिली. जमावाने कारला घेरल्याने चालकाने पुन्हा मागे वळून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाही. कार विजेच्या खांबाला धडकली. जमावाने आरोपींवर हल्ला केला. पोलिसांनी त्याला कसेबसे वाचवले आणि हुसैनाबाद चौकीत नेले.

संतप्त जमावाने कारवर विटा आणि काठ्यांनी हल्ला करून नुकसान केले. पोलीस आणि लोकांनी घंटाघर ते हुसैनाबाद चौकीपर्यंत 1 किलोमीटरपर्यंत कार चालकाचा पाठलाग केला. कारमध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या.

पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवले

या घटनेनंतर हुसेनाबाद परिसरात रात्री उशिरापर्यंत गर्दी जमली होती. पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवले. ठाकूरगंजचे निरीक्षक म्हणाले की, आरोपी ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. आयुष्मान उपाध्याय असे चालकाचे नाव आहे. तो राजाजीपुरमचा रहिवासी आहे. ही कार कोणाची होती, सर्व काही तपासले जात आहे.

गाडी चालवताना पाहून लोक घाबरले

प्रत्यक्षदर्शी मेराजने सांगितले की, मी मेडिकल स्टोअरमध्ये औषध घेत होतो. लोकांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. मी मागे वळून पाहिलं तर पब्लिक स्टॉप-स्टॉप ओरडत होती. एक वेगवान गाडी पुढे जात होती. जनता आणि पोलीस त्याच्या मागे धावत होते. एखाद्या चित्रपटाचे चित्रीकरण चालू आहे असे वाटत होते. अशी रफ ड्रायव्हिंग पाहून लोक घाबरले. पुढे खांबाला धडकून गाडी थांबली. ड्रायव्हरच्या स्थितीवरून तो दारूच्या नशेत असल्याचे सूचित होते.

अपघातात एकाच कुटुंबातील ३ जण जखमी 

जुबेर अहमद म्हणाले की, अपघातात जखमी झालेल्यांपैकी तिघे त्याच्या कुटुंबातील सदस्य आहेत. त्याचा भाऊ व इतर नातेवाईक जखमी झाले आहेत. चालक पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होता. चालकाचे वाहन तात्काळ जप्त करून परवाना रद्द करावा, अशी आमची मागणी आहे. कठोर कारवाई करावी. अपघातात जखमी झालेल्या सर्वांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च आरोपी चालकाकडून वसूल करण्यात यावा. याप्रकरणी ठाकूरगंज पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Fire News: वडगाव शेरी परिसरात सुपर मार्केटला भीषण आग; अग्निशमन दलाकडून 8 वाहने दाखल, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू
वडगाव शेरी परिसरात सुपर मार्केटला भीषण आग; अग्निशमन दलाकडून 8 वाहने दाखल, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू
jayant Patil : नाथाभाऊ नेमके कोणासोबत? एकनाथ खडसेंबाबत प्रश्न विचारताच जयंत पाटलांचं अजब उत्तर; म्हणाले...
नाथाभाऊ नेमके कोणासोबत? एकनाथ खडसेंबाबत प्रश्न विचारताच जयंत पाटलांचं अजब उत्तर; म्हणाले...
Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा रद्द! मंत्री उदय सामंत यांची माहिती, काय आहे कारण?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा रद्द! मंत्री उदय सामंत यांची माहिती, काय आहे कारण?
Weekly Horoscope 23 To 29 September 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bachchu Kadu Amravati : 26 तारखेपर्यंत जरांगेंची वाट बघू अन्यथा..., बच्चू कडूंचा सरकारलाही इशाराSHAHAJI BAPU ON UDHAV:ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत,ही काळ्या दगडावरचीDharavi Mosque News : मशिदीचा अवैध भाग तोडला, धारावीत ग्राऊंड झिरोवर एबीपी माझाBJP Oppose to Anna Bansode : राष्ट्रवादीचा प्रचार नाही करणार, अण्णा बनसोडेंना भाजपचा विरोध

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Fire News: वडगाव शेरी परिसरात सुपर मार्केटला भीषण आग; अग्निशमन दलाकडून 8 वाहने दाखल, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू
वडगाव शेरी परिसरात सुपर मार्केटला भीषण आग; अग्निशमन दलाकडून 8 वाहने दाखल, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू
jayant Patil : नाथाभाऊ नेमके कोणासोबत? एकनाथ खडसेंबाबत प्रश्न विचारताच जयंत पाटलांचं अजब उत्तर; म्हणाले...
नाथाभाऊ नेमके कोणासोबत? एकनाथ खडसेंबाबत प्रश्न विचारताच जयंत पाटलांचं अजब उत्तर; म्हणाले...
Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा रद्द! मंत्री उदय सामंत यांची माहिती, काय आहे कारण?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा रद्द! मंत्री उदय सामंत यांची माहिती, काय आहे कारण?
Weekly Horoscope 23 To 29 September 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Pune News: लाज गेली! पुण्याच्या खड्ड्यांवर द्रौपदी मुर्मू नाराज, दौऱ्यावेळी मोठा त्रास झाल्याचे राष्ट्रपती कार्यालयाची नाराजी, पुणे पोलिसांचं पालिकेला पत्र...
लाज गेली! पुण्याच्या खड्ड्यांवर द्रौपदी मुर्मू नाराज, दौऱ्यावेळी मोठा त्रास झाल्याचे राष्ट्रपती कार्यालयाची नाराजी, पुणे पोलिसांचं पालिकेला पत्र...
देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण धनगरांनी विरोध केला तर...; मनोज जरांगेंचा इशारा
देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण धनगरांनी विरोध केला तर...; मनोज जरांगेंचा इशारा
Mhada :  ठाण्यात 20 ते 30 लाखांत घरं, म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 7 हजार घरांसाठी लवकरच लॉटरी, आचारसंहितेपूर्वी जाहिरात येणार?
म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 7 हजार घरांसाठी लवकरच लॉटरी, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहिरात येणार?
Astrology : 13 ऑक्टोबरपर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन; कमावणार भरपूर पैसा, संपत्तीत होणार अफाट वाढ
13 ऑक्टोबरपर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन; कमावणार भरपूर पैसा, संपत्तीत होणार अफाट वाढ
Embed widget