(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lpg Gas Price Today: 100 रुपये महागला गॅस सिलेंडर, जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमती
Gas Cylinder Price : आधीच कोरोना संकट आणि इंधन दरवाढीमुळे हैराण असलेल्या नागरिकांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
Gas Cylinder Price : आधीच कोरोना संकट आणि इंधन दरवाढीमुळे हैराण असलेल्या नागरिकांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. एक डिसेंबरपासून कमर्शिअल सिलिंडरच्या दरात तब्बल 100 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात ऐन दिवाळीत कमर्शिअल सिलेंडरच्या दरात 266 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. म्हणजेच दोन महिन्याच्या आत कमर्शिअल गॅसच्या किंमतीमध्ये 366 रुपयांची वाढ झाली आहे. लासादायक बाब म्हणजे, घरगुती वापरासाठीच्या 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरची किंमत 899.50 रुपयांवर कायम आहे.
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला इंधन कंपन्यांकडून एलपीजी गॅस सिलिंडरच्या दराचा आढावा घेतला जातो. या आढाव्यात एलपीजी सिलिंडरचे दर कमी करावे की त्यात वाढ करावी याबाबत निर्णय घेतला जातो. बैठकीनंतर प्रत्येक कंपनीकडून दर महिन्याच्या एक तारखेला व्यावसायिक आणि एलपीजी सिलिंडरचे नवे दर जाहीर केले जातात. काही वेळेस दर कायम ठेवले जातात. मात्र, वर्षाच्या शेवटच्या महिन्यात कमर्शिअल सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. तर विनाअनुदानित सिलेंडरचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत.
कमर्शिअल सिलेंडरच्या किंमती दोन हजारांच्या पार commercial gas cylinder price on 1 december 2021 –
आज वाढवण्यात आलेल्या कमर्शिल गॅसच्या किंमतीनंर महागाईचा भडका उडाला आहे. राजधानी दिल्लीमध्ये 19 किलो वजनाच्या कमर्शिअल सिलेंडरची किंमत 2101 रुपये इतकी झाली आहे. मुंबईमध्ये 1950 रुपयांना मिळणारा कमर्शिअल सिलेंडर आता 2051 रुपयांना मिळेल. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये 19 किलो वजनाचा कमर्शिअल सिलिंडर 2177 रुपयांना झालाय. चेन्नईमध्ये कमर्शिल गॅसची किंमत देशात सर्वाधिक आहे. चेन्नईमध्ये 19 किलो वजनाचा सिलिंडर घेण्यासाठी 2234 रुपये मोजावे लागतील.
अधिकृत संकेतस्थळावर तपासा लेटेस्ट रेट्स –
https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही तुमच्या शहरातील गॅस सिलेंडरच्या किंमती तपासू पाहू शकता. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेल्या गॅस सिलेंडरच्या किंमती जारी केल्या जातात.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
संबधित बातम्या :
LPG Gas cylinder: काय तुम्ही एक्स्पायर झालेला सिलेंडर वापरताय? वेळीच सावध व्हा, नाहीतर...
एक डिसेंबरपासून काही किंमतीत बदल; काय होणार महाग, काय होणार स्वस्त?